शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकांत डोंगरे यांचे निधन

By admin | Updated: July 19, 2014 02:26 IST

महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि रिपब्लिकन

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष : आज अंत्यसंस्कारनागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. सूर्यकांत जागोबाजी डोंगरे यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी सकाळी ११.३० वाजता वैशालीनगर निर्वाणघाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अ‍ॅड. सूर्यकांत डोंगरे यांचा जन्म १० मार्च १९३६ रोजी नागपुरातील काचीपुरा (इतवारी) येथे झाला.अ‍ॅड. हरिदास आवळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते आंबेडकरी चळवळीत कार्य करू लागले. विद्यार्थीदशेपासूनच विविध आंदोलनात ते सक्रिय राहिले. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते. आचार्य अत्रे यांनी सुरू केलेल्या दैनिक मराठा वृत्तपत्राचे संपादनही केले. त्यांनी समाज प्रबोधनार्थ ‘रिपब्लिकन आंदोलन’ व ‘रिपब्लिकन विचार’ या दोन पत्रिकांचे संपादन केले. उत्तर नागपूर विधानसभेचे ते सलग दोन टर्म आमदार होते.७ एप्रिल १९७९ रोजी ते विधानसभेचे उपसभापती म्हणून अविरोध निवडून आले. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातूनच २० जानेवारी १९८५ रोजी एकीकरण झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची रीघ लागली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष वसंत पुरके, मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष सी.एस. थूल यांनी दूरध्वनीवरून डोंंगरे कुटुंबीयांचे सांत्वन करीत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. रोजगार हमी योजना आणि जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत, ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद खांडेकर, विश्व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते हरिदास टेंभुर्णे, इंजिनियर विजय चिकाटे, ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे, काँग्रेसचे माजी शहाराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, विनीता तिरपुडे, सेवानिवृत्त न्यायाधीश एस.डी. सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या प्लॉट क्र. ८ गुरुनानकपुरा डॉ. आंबेडकर मार्ग येथील निवासस्थानाहून निघेल. डॉ. आंबेडकर मार्गे एस.सी.एस.गर्ल्स एज्युकेशन संस्था वैशालीनगर मार्गे, वैशाली निर्वाण घाट येथे पोहोचेल. तिथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाईल.(प्रतिनिधी)