शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी कुलगुरूपदी अनुपकुमार यांच्या नियुक्तीचे समर्थन

By admin | Updated: September 19, 2014 00:51 IST

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय व इतर विविध संदर्भ देऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची

हायकोर्टात अंतिम युक्तिवादाला सुरुवात : पुढील सुनावणी २५ सप्टेंबरलानागपूर : महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय व इतर विविध संदर्भ देऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय योग्य असल्याचे वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांनी आज, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सांगितले.विद्यापीठात लवकरात लवकर कुलगुरूची नियुक्ती करण्यात यावी व कुलगुरूपदी पात्र व्यक्तीची निवड करण्याचा अधिकार, कुलपतींना देणाऱ्या कलमाचा अन्वयार्थ लावण्यात यावा यासाठी सिनेट सदस्य गुरुदास कांबडी यांनी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. आज सुमारे दोन तास सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी निश्चित केली. दरम्यान, कुलपतींतर्फे अ‍ॅड. मनोहर यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद अर्धवट असून पुढच्या तारखेला ते उर्वरित मुद्दे मांडतील. त्यांच्यापूर्वी याचिकाकर्त्याचे वकील भानुदास कुलकर्णी व मध्यस्थ प्रा. सुनील मिश्रा यांनी बाजू मांडली. नियमित कुलगुरूची नियुक्ती शक्य तेवढ्या लवकर करणे किती आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांचे खंडपीठ प्रकरण ऐकत आहे. डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर कुलपतींनी गेल्या ३० मार्चच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे कुलगुरूचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. कुलगुरू विद्यापीठाच्या सर्व वैधानिक मंडळे व निवड समितीचे प्रमुख असतात. यामुळे अशा पदांवर विद्वान व्यक्तीचीच नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. विद्यापीठातर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, विभागीय आयुक्तांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे, तर शासनातर्फे अ‍ॅड. भारती डांगरे कामकाज पाहात आहेत.(प्रतिनिधी)