शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या अर्जासाठी चढा देवडियाची पायरी

By admin | Updated: August 6, 2014 01:13 IST

शहरातील सहापैकी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी हवी असेल तर इच्छुक उमेदवाराला देवडिया काँग्रेस भवनाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत.

आजपासून अर्ज वितरण : ११ पर्यंत मुंबईला पाठविणारनागपूर : शहरातील सहापैकी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी हवी असेल तर इच्छुक उमेदवाराला देवडिया काँग्रेस भवनाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. येथे उद्या, बुधवारपासून १० आॅगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार आहेत. देवडिया काँग्रेस भवनात एरवी आयोजित जयंती, पुण्यतिथीच्या कार्यक्रमांना मोजकेच पदाधिकारी उपस्थित असतात. स्वत:ला पक्षापेक्षा मोठे अनेक नेते तर वर्षानुवर्षे देवडिया काँग्रेस भवनाकडे फिरकूनही पाहत नाहीत. येथे आयोजित बैठकांना उपस्थितही राहत नाहीत. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज घेण्यासाठी त्यांना देवडियात यावे लागणार आहे. सरचिटणीस बंडोपंत टेंभूर्णे, डॉ. गजराज हटेवार, तुफैल अशर हे सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत अर्ज वितरित करतील. शहर काँग्रेसकडे भरून सादर केलेले अर्ज ११ आॅगस्टपर्यंत प्रदेश कार्यालयाकडे पाठविले जातील. २००९ च्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते, तेथे उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण वर्गासाठी पाच हजार रुपयांचा तर महिला व आरक्षित वर्गासाठी २५०० रुपये पक्षनिधी म्हणून रोख किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करायचे आहेत. मतदारसंघ वाटपाच्या चर्चेत जर जुन्यापैकी काही मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडले गेले तर, त्या मतदारसंघासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांचे शुल्क परत केले जाणार आहे. जे मतदारसंघ राष्ट्रवादी व मित्रपक्षांसाठी सोडले होते, त्या मतदारसंघासाठी अर्ज करताना कुठलेही शुल्क भरण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस मागे राहिली. असे असले तरी सर्वच मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. हे पाहता बुधवारपासून देवडियामधील वर्दळ पुन्हा एकदा वाढणार आहे. (प्रतिनिधी)