शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
5
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
10
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
11
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
12
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
13
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
14
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
15
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
16
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
17
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
18
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
19
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
20
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
Daily Top 2Weekly Top 5

मोहन खेडकरांविरुद्धच्या ‘एफआयआर’वर स्थगिती

By admin | Updated: May 28, 2014 00:57 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्याविरुद्ध बांधाबांध भत्ता (बदली अनुदान) प्रकरणी नोंदविण्यात आलेला प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) व पुढील फौजदारी कार्यवाहीवर मुंबई उच्च

हायकोर्टाचा दिलासा : बहुचर्चित बांधाबांध भत्ता प्रकरण

नागपूर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्याविरुद्ध बांधाबांध भत्ता (बदली अनुदान) प्रकरणी नोंदविण्यात आलेला प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) व पुढील फौजदारी कार्यवाहीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज, मंगळवारी स्थगनादेश दिला आहे.

नागपुरातील विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थानमधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. डॉ. मोहन खेडकर यांची २0११ मध्ये अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थानकडून प्रतिनियुक्ती अधिक बदली आदेश घेऊन त्यांनी कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानंतर त्यांनी विद्यापीठात बांधाबांध भत्ता मिळण्यासाठी अर्ज केला होता.

विद्यापीठानेही त्यांना ७५ हजार रुपयांचा बांधाबांध भत्ता मंजूर केला होता. परंतु, कुलगुरूंना बांधाबांध भत्ता देय आहे की नाही यासंदर्भात प्राधिकरणांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी विद्यापीठाला भत्ता परत केला होता. तसेच, कुलपतींना पत्र लिहून बांधाबांध भत्त्याबाबत माहिती मागवली होती. त्यावर कुलपतींनी कुलगुरूंना बांधाबांध भत्ता देय नसल्याचे कळविले होते.

यानंतर प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता असताना प्र-पाठकपदावरून बडतर्फ झालेले राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. खेडकर व कुलसचिव डॉ. दिनेश जोशी यांच्याविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करून बांधाबांध भत्ताप्रकरणी विद्यापीठाची फसवणूक केल्यामुळे दोघांविरुद्धही गुन्हा नोंदविण्याची विनंती केली. जेएमएफसी न्यायालयाने गेल्या १६ मे रोजी डॉ. खेडकर व डॉ. जोशी यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४१८, ४२0, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिलेत. यावरून फ्रेजरपुरा पोलिसांनी २१ मे रोजी दोघांविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे. याविरुद्ध डॉ. खेडकर यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने उपरोक्त आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)