नागपुरात सुसाट कारचा थरार; आधी दुचाकीला उडवलं, मग पादचारी महिलेला चिरडलं! व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 20:19 IST2026-02-26T19:52:38+5:302026-02-26T20:19:54+5:30

नागपुरात एका भरधाव कारने चिरडल्याने वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Speeding Car Rams Scooter Mows Down Pedestrian in Nagpur Ranapratap Nagar 61 Year Old Woman Killed | नागपुरात सुसाट कारचा थरार; आधी दुचाकीला उडवलं, मग पादचारी महिलेला चिरडलं! व्हिडिओ व्हायरल

नागपुरात सुसाट कारचा थरार; आधी दुचाकीला उडवलं, मग पादचारी महिलेला चिरडलं! व्हिडिओ व्हायरल

Nagpur Accident: नागपुरातील राणाप्रताप नगर भागात एका शनिवारी संध्याकाळी सुसाट कारने अक्षरशः तांडव घातला. भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे चालवलेल्या कारने आधी एका तरुणीच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर एका ज्येष्ठ महिलेला चिरडले. या भीषण अपघातात ६१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून एक १९ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

राधेमंगल हॉल ते स्वरूप नगरला जोडणाऱ्या रोडवर, विजया हॉस्पिटलजवळ संध्याकाळी ६ च्या सुमारास हा अपघात घडला. एका वेगाने येणाऱ्या कारने सुरुवातीला १९ वर्षीय तरुणीच्या स्कुटीला जोराची धडक दिली. या धडकेमुळे तरुणी रस्त्यावर फेकली गेली आणि जखमी झाली. मात्र, एवढा मोठा अपघात होऊनही चालक थांबला नाही. उलट, कारवरील नियंत्रण सुटल्याने ती कार जवळच चालत असलेल्या ६१ वर्षीय महिलेला धडकली.

पोल आणि डीबी बॉक्सला धडकून कार थांबली

ज्येष्ठ महिलेला चिरडल्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला आणि डिस्ट्रिब्युशन पॅनल बॉक्सला जाऊन धडकली. खांबाला धडक बसल्यानंतर कार थांबली आणि चालक बाहेर पडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात कारचा वेग आणि झालेला भीषण आघात स्पष्टपणे दिसत आहे.

महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मृत महिला ही दीनदयाळ नगरची रहिवासी होती. अपघातानंतर त्यांना तातडीने विवेका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर संतापाची लाट

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाचा संदर्भ देत एका युजरने म्हटले की, आता पुन्हा न्यायाधीश त्याला निबंध लिहायला सांगतील आणि सोडून देतील. तर दुसऱ्या एका युजरने अल्पवयीन गुन्हेगारांबाबतच्या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, रस्त्यांना लोक रेसट्रॅक कधी समजणं थांबवणार? असा सवाल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title : नागपुर में कार का कहर: महिला की मौत, बाइक सवार घायल।

Web Summary : नागपुर में एक तेज रफ्तार कार ने एक स्कूटर को टक्कर मार दी, जिससे एक युवती घायल हो गई, और फिर विजया अस्पताल के पास एक 61 वर्षीय महिला को कुचल दिया, जिससे उसकी मौत हो गई। कार रुकने से पहले एक खंभे से टकरा गई। बुजुर्ग महिला की अस्पताल में मौत हो गई। इस घटना से आक्रोश फैल गया।

Web Title : Nagpur Car rampage: Woman killed, biker injured in hit-and-run.

Web Summary : In Nagpur, a speeding car hit a scooter, injuring a young woman, and then fatally struck a 61-year-old woman near Vijaya Hospital. The car crashed into a pole before stopping. The elderly woman died in hospital. The incident sparked outrage.