शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनच्या संथ गतीने बॅकलॉग वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 00:18 IST

काही ठराविक दिवस वगळल्यास नागपुरात जुलै महिन्यात पावसाळी ढग शांत झाले आहेत. पाऊस होत नसल्याने उष्णता वाढली आहे. विदर्भातील तीन जिल्हे कमी पावसामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. सध्या विदर्भात २६९.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देआठवडाभरापासून पावसाचे ढग शांत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काही ठराविक दिवस वगळल्यास नागपुरात जुलै महिन्यात पावसाळी ढग शांत झाले आहेत. पाऊस होत नसल्याने उष्णता वाढली आहे. विदर्भातील तीन जिल्हे कमी पावसामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. सध्या विदर्भात २६९.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. साधारणत: या काळात सरासरी २७२.६ मिमी पावसाची नोंद होत असते. यावरून स्पष्ट दिसते की आठवडाभर पाऊस थांबला असल्याने पावसाचा बॅकलॉग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शहरात या मान्सूनमध्ये आतापर्यंत ३९८.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. १ जूनपासून ११ जुलैपर्यंत नागपुरात सरासरी ६ टक्के, अमरावतीत ५, चंद्रपूरमध्ये ३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मात्र याउलट गडचिरोलीत २ टक्के, भंडारा २ टक्के आणि वर्ध्यात ३ टक्के पाऊस कमी झाला. गोंदिया जिल्ह्यात सामान्यपेक्षा २८, अकोल्यामध्ये २१ टक्के आणि यवतमाळमध्ये २० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे कमी पावसामुळे हे तिन्ही जिल्हे रेड झोनमध्ये आले आहेत. वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांची स्थिती समाधानकारक आहे. या दोन्ही जिल्ह्यात सामान्यपेक्षा अनुक्रमे ३६ आणि २१ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली.उमसने वाढविला मनस्तापशहरात शनिवारी सकाळपासून ढग दाटले होते. दुपारपर्यंत राहून राहून ढगांमधून ऊन तापत होते. हवेचा वेग कमी असल्याने आणि वातावरणात आर्द्रता असल्याने उमस वाढायला लागली आहे. कमाल तापमान सामान्यपेक्षा एक अंश अधिक म्हणजे ३३.२ अंश आणि रात्रीचे तापमान २४.३ अंशावर कायम होते.विदर्भाच्या काही जिल्ह्यात पाऊसविदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३०.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय अकोलामध्ये २७.४ मिमी, गोंदियात १४.२ मिमी, वर्ध्यात १६ मिमी, अमरावतीत ४ मिमी, ब्रह्मपुरीत ३.२ मिमी आणि बुलडाण्यात २ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर