शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाघाची हाडे, मिशा, नखे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बेला : तस्करी करण्याच्या उद्देशाने वाघाचे अवयव बाळगणाऱ्या सहा जणांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेला : तस्करी करण्याच्या उद्देशाने वाघाचे अवयव बाळगणाऱ्या सहा जणांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून वाघाची हाडे, मिशा व नखे जप्त करण्यात आली आहेत. या आराेपींना न्यायालयाने चार दिवसांची वनकाेठडी सुनावली आहे, अशी माहिती बुटीबाेरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही. ठाेकळ यांनी दिली.

श्रीदास बळीराम कडते, प्रभाकर बालाजी ताेडासे, मुरलीधर केशव नैताम, याेगेश लालश्याम ताेडासे, रामचंद्र तुकाराम बावणे व श्रीराम लक्ष्मण पाेरेते अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. याेगेश, रामचंद्र व श्रीराम यांच्याकडे वाघाचे अवयव असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. ९) सापळा रचून या तिघांना बाेरखेडी टाेल नाका परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वाघाची सहा नखे व १३ मिशा आढळून येताच त्यांना अटक केली. या तिन्ही आराेपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे वन कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १०) श्रीदास, प्रभाकर व मुरलीधर या तिघांना ताब्यात घेत त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात वन कर्मचाऱ्यांना वाघाच्या शरीराचे काही अवशेष आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले.

या सर्व आराेपींना शनिवारी नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. न्यायालयाने सहाही आराेपींना चार दिवसांची अर्थात मंगळवार (दि. १४) पर्यंत वनकाेठडी सुनावली आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही..ठाेकळ, वनपाल केकाण, जे.डी. जाेधे, ए.व्ही. जनवार, शेंडे, टवले, चव्हाण, पडवाल, गणेश जाधव, महादेव मुंडे, ताडाम, मरसकाेल्हे, धुर्वे, सुधीर कुलरकर, आर.एस. पाेराटे यांच्या पथकाने केली.

...

जप्त केलेला मुद्देमाल

या प्रकरणात वन विभागाने आराेपींकडून वाघाची पाच हाडे (६०० ग्रॅम), ५५ नग मिशा, २२ नग नखे, साळिंदरचा एक काटा, एक खवले मांजर, वाघाच्या हाडांचे तुकडे (१३५ ग्रॅम), दाेन भाले, विद्युत तारांचे बंडल आदी साहित्य जप्त केले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही. ठाेकळ यांनी दिली.