शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
3
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
4
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
5
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
6
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
7
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
8
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
9
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
10
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
11
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
12
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
13
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
14
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
15
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
16
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
17
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
18
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
19
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
20
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहाच्या सुरक्षेला तडे!

By admin | Updated: June 16, 2014 01:16 IST

कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सर्रासपणे मोबाईल पोहोचत आहेत. बंदिस्त कच्चे कैदी मोबाईलचा वापर करून खंडणी वसूल करीत आहेत. व्यापारी आणि अन्य व्यवसायिकांम

खंडणी वसुलीसाठी मोबाईलचा वापर : जामर लावण्याची गरज
राहुल अवसरे - नागपूर
कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सर्रासपणे मोबाईल पोहोचत आहेत. बंदिस्त कच्चे कैदी मोबाईलचा वापर करून खंडणी वसूल करीत आहेत. व्यापारी आणि अन्य व्यवसायिकांमध्ये दहशत पसरवीत आहेत. कारागृह सुरक्षा व्यवस्थेचे हे अपयशच आहे. यावर मात म्हणून कारागृहातील मोबाईल सेवाच निष्क्रिय करण्याची गरज आहे. त्यासाठी परिसरात जामर यंत्रणा उभारण्यात यावी किंवा नजीकचे संपूर्ण मोबाईल टॉवर सील करावे, असे जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे.
आपल्या गुन्हेगारी कृत्याने समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा व्हावी, समाज व्यवस्था सुरक्षित व निर्भय राहावी, या मुख्य हेतूतून कारागृहांची निर्मिती झाली. परंतु हल्ली कारागृह हे समाजात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांसाठी अड्डे झाले आहेत. खंडणी वसुली आणि ‘सुपारी किलिंग’ चे गुन्हे कारागृहाच्या उंच भिंतीच्या आडून घडत असेल तर कारागृह निर्मितीमागील मूळ हेतूच संपुष्टात येतो. उंच भिंतीआडून अनेक गुन्हे घडतात परंतु काहीच चव्हाट्यावर येतात. अनेक जण भीतीपोटी तक्रार करण्याचे धाडसच करीत नाहीत.
कारागृहातून खंडणी वसूल करण्याचा नुकताच एक प्रकार उजेडात आला. अजनी भागात राहणारा कुख्यात गुन्हेगार अमर लोहकरे हा महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. सध्या तो कच्चा कैदी आहे. त्याने २५ मे २०१४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बजरंगनगर येथील हार्डवेअर व्यवसायी शेषराव आष्टनकर यांना कारागृहातून बाहेर येण्यासाठी दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. या व्यावसायिकाने हिम्मत करून अजनी पोलीस ठाण्यात या गुंडाविरुद्ध तक्रार केली आणि कारागृहात चालणारे कारस्थान उजेडात आले. चालू वर्षाच्या प्रारंभीच कारागृह अधिकाऱ्याने आपल्या पथकासह कारागृहात धाडी घालून मोंटी भुल्लर खुनातील आरोपी दिवाकर कोथुलवार, आशिष कोथुलवार, मंगेश शेंडे, सेव्हन हिल्स बार खुनातील आरोपी तुषार दलाल, लच्छू फाये आणि अन्य एक कुख्यात गुन्हेगार संजय अवतारे यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर मोबाईल, रोख रक्कम आणि मादक पदार्थ जप्त करण्याची कारवाई केली. हे मोबाईल नेमके कोणाचे होते, ते कारागृहात कसे काय आले, मोबाईलचा कोणत्या कामासाठी वापर झाला आदी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. धाडीच्या या प्रकरणावरच पुढे पांघरूण घालण्यात आले. कारागृहात दाखल होणाऱ्या आरोपींची वेगवेगळ्या टप्प्यात कसून अंगझडती घेतली जाते. तरीही मोबाईल आणि आक्षेपार्ह वस्तू कशा काय आत झिरपतात, असा प्रश्न आहे. आजही अनेक मोबाईल कारागृहात असून त्यांचा वापर खंडणी वसुली आणि साक्षीदारांना फितूर करण्यासाठी केला जात आहे.
‘लँड लाईन’चाच वापर हवा
कारागृहातून सुरू झालेली ही नव्या स्वरूपाची गुन्हेगारी रोखणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तिला भविष्यात आणखी भयावह स्वरूप प्राप्त होऊ शकते. कारागृह सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. कारागृह प्रशासनाने संपर्कासाठी केवळ ‘लँड लाईन’चाच वापर केला पाहिजे. कारागृह परिसरात संपूर्ण जामर यंत्रणा बसविली जावी किंवा या परिसरातील संपूर्ण मोबाईल टॉवर सील केले जावे, असेही या सूत्रांचे म्हणणे आहे.