शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपमुळे लागला वडिलांचा शोध

By admin | Updated: March 6, 2016 02:56 IST

रागाने घर सोडून कोईम्बतूर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसून जयपूरकडे जाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हॉट्स अपवर फोटो पाठवून रेल्वे सुरक्षा दलाने धावत्या गाडीत या व्यक्तीचा शोध लावल्याची घटना शनिवारी घडली आहे.

नागपूर : रागाने घर सोडून कोईम्बतूर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसून जयपूरकडे जाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हॉट्स अपवर फोटो पाठवून रेल्वे सुरक्षा दलाने धावत्या गाडीत या व्यक्तीचा शोध लावल्याची घटना शनिवारी घडली आहे.सिव्हिल लाईन्स येथील मनोरुग्ण असलेल्या वडिलांचे त्यांच्या मुलींसोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे त्यांनी आपली कार घेऊन थेट रेल्वेस्थानक गाठले. रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमध्ये कार उभी करून त्यांनी ड्रायव्हरला कार घेऊन जाण्यास सांगितले. लगेच त्यांच्या मुलींनी रेल्वे सुरक्षा हेल्पलाईन १८२ वर संपर्क साधून रेल्वे सुरक्षा दलाला या घटनेची माहिती दिली. रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक होती लाल मिना यांनी सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या मुलींना दाखविले. याशिवाय त्यांच्या वडिलांचा फोटो आरपीएफच्या ग्रुपवर पाठविला. घटनेची माहिती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित मुलींचे वडील एका टीसी सोबत बोलताना आणि त्यानंतर प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२९६९ कोईम्बतूर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसल्याचे आढळले. नेमक्या याच गाडीत रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी प्रवास करीत होते. त्यांचा फोटो काढून व्हॉट््स अपवर पाठविला. रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा याने त्यांच्या मुलींना हा फोटो दाखविताच त्यांनी आनंद व्यक्त करून रेल्वे सुरक्षा दलाच्या तत्परतेने कार्य करण्याच्या कृतीबद्दल त्यांना धन्यवाद दिले.(प्रतिनिधी)