शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी; ऑनलाईन वर्गात नको ते मेसेज व्हायरल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ महिन्यांपासून शाळा ऑनलाईन सुरू आहेत. बऱ्याचदा ऑनलाईन वर्ग सुरू असताना चुकीचे प्रकार घडत ...

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ महिन्यांपासून शाळा ऑनलाईन सुरू आहेत. बऱ्याचदा ऑनलाईन वर्ग सुरू असताना चुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ऑनलाईन वर्गाचे हसे होते अथवा शरमेने मान खाली घालावी लागते. कारण काही अश्लील मेसेज, व्हिडीओ अचानक सुरू होतात. असले प्रकार ऑनलाईन वर्गात अनेकदा घडले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाले आहेत.

मागील १७ महिन्यांपासून महाराष्ट्रात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे पालकांना नाईलाजाने विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल घेऊन द्यावे लागत आहेत. त्यामुळे पालकांचा आर्थिक खर्च वाढला आहे. सोबतच ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांची, शिक्षकांची व पालकांची देखील डोकेदुखी वाढलेली आहे. कारण ऑनलाईन शिक्षण सुरू असताना इंटरनेट आवश्यक असते आणि कुठल्याही शैक्षणिक लिंकवर गेले असता, नको त्या जाहिरातीच्या लिंक, तसेच नको त्या अश्लील लिंक, चित्र, व्हिडीओ समोर येतात. विद्यार्थी कुतूहलापोटी व उत्सुकतेपोटी लिंकला छेडतात. कधी अनवधानाने, तर कधी मुद्दाम विद्यार्थी व्हिडीओ ग्रुपवर सेंड करतात. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही त्याचा त्रास होतो. पालकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

शाळांनी घ्यावयाची काळजी...

एखादा शिक्षक जर ऑनलाईन वर्ग घेत असेल, त्या शिक्षकाला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची ओळख असायला हवी. ऑनलाईन वर्गात खोड काढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चौकस असण्याची गरज आहे. शिक्षकांनी पाठविलेली लिंक विद्यार्थ्यांनी इतरांना पाठवू नये, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याची गरज आहे.

पालकांनी घ्यावयाची काळजी...

पालकांना आता मोबाईलची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थी काय शिकतात, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुले चोरून लपून काही करीत असतील, तर त्यांच्यावर कटाक्ष ठेवणे पालकांचे कर्तव्य आहे. मुलांचे चुकीच्या गोष्टीबाबत समुपदेशन करणे गरजेचे आहे. शक्यतो ऑनलाईन वर्गानंतर मुलांकडे मोबाईल देऊच नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ऑनलाईन शिक्षणाचे जितके फायदे तितकेच तोटे आता निदर्शनास येत आहेत. विद्यार्थी शैक्षणिक, शारीरिक, सांस्कृतिक, मानसिक व सामाजिक मूल्यांशी दुरावत चाललेला आहे. आरोग्यासंदर्भातही अनेक दुष्परिणाम निदर्शनास आलेले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने आता तरी शाळांचे काही तरी नियोजन करणे आवश्यक आहे.

- अनिल महादेवराव शिवणकर, शिक्षक

शाळा ज्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेते, त्या ॲप्सचे प्रिमियम व्हर्जन घ्यावे. कारण त्यात जास्त सेक्युरिटी मेझर्स असतात. ते ॲप्स हाताळण्यासाठी, त्यातील बारकावे शिक्षकांना अवगत करून देण्यासाठी त्यांचेही वर्कशॉप घेणे गरजेचे आहे. खरे तर ऑनलाईन वर्गात नको ते मेसेज व्हायरल होत असतील, तर ते शिक्षकच टाळू शकतात.

- तेसज अंजनकर, सायबरतज्ज्ञ