शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

एलेक्सिस प्रकरणात साहिलला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:46 IST

इस्पितळ प्रशासनावर उलटसुलट आरोप लावून एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्या कुख्यात साहिल सय्यद याला न्यायालयाने आज जामीन मंजूर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इस्पितळ प्रशासनावर उलटसुलट आरोप लावून एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्या कुख्यात साहिल सय्यद याला न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला कारागृहात पाठविण्यात आले. दुसरीकडे याच गुन्ह्यात-आरोपी असलेली साहिलची पत्नी नीलिमा जयस्वाल-तिवारी हिला बुधवारी पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.वेगवेगळ्या नेत्यांसोबतचे फोटो स्वत:च सोशल मीडियावर व्हायरल करून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात साहिल सय्यद याची हनी ट्रॅपच्या कटाची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी साहिल विरुद्ध कारवाईचा पाश आवळला. या पार्श्वभूमीवर, साहिलविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात दोन, तर पाचपावली, बजाजनगर, तहसील आणि नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील मानकापूरच्या एलेक्सिसच्या गुन्ह्यात सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मयूर चौरसिया यांनी साहिलला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करून त्याचा चार दिवसाचा पीसीआर मागण्यात आला. मात्र न्यायालयाने तो नामंजूर करून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्याच्या वकिलांनी लगेच त्याचा जामीन अर्ज न्यायालयात ठेवला. त्यानुसार त्याला या गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला दरम्यान, त्याच्यावर दाखल असलेल्या अन्य गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला कारागृहात पाठवण्यात आले. आता त्याला तहसीलमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसविण्याचे कटकारस्थान रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या गुन्ह्याच्या चौकशीची तयारी पोलिसांनी करून ठेवली आहे.व्हाईस सॅम्पल घेतलेचौकशी दरम्यान पोलिसांनी साहिलचे व्हॉईस सॅम्पल (आवाजाचे नमुने) घेतले असून ते फॉरेन्सिकला पाठविण्यात आले आहे.नीलिमाला बुधवारी अटक करणार?एलेक्सिस प्रकरणात आरोपी असलेली साहिलची पत्नी नीलिमा जयस्वाल-तिवारी हिला बुधवारी अटक होण्याची शक्यता आहे. सध्या ती कारागृहात आहे.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर