नागपूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. विशेषतः महिला आरक्षण आणि काँग्रेसच्या भूमिकेवरून त्यांनी सडकून टीका केली.
महिला आरक्षणावरून काँग्रेसवर निशाणा
बावनकुळे म्हणाले की, "लोकसभेत नारीशक्ती अधिनियम विधेयकाला विरोध करून काँग्रेसने आपले महिला विरोधी धोरण पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. १९९६ पासून देवेगौडा आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात काँग्रेसने चार वेळा या विधेयकाला विरोध केला होता. ७० कोटी महिला भगिनींना राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले आहे.
ते पुढे म्हणाले, आज जर ३३% आरक्षण मिळाले असते, तर महाराष्ट्रात अनेक महिला खासदार आणि आमदार झाल्या असत्या. महिला आरक्षणाचे विधेयक पडल्यानंतर काँग्रेसने केलेला जल्लोष हा नारीशक्तीचा अपमान आहे. आगामी निवडणुकीत देशातील महिला या विरोधात मतदान करून काँग्रेसला धडा शिकवतील.
मतदारसंघांची पुनर्रचना आणि ओबीसी आरक्षण
सरकारचा हेतू केवळ जागा वाढवून महिलांना संधी देणे हाच नव्हता, तर मतदारसंघांची पुनर्रचना करून जनतेला न्याय देणे हा होता. मतदारसंघ लहान झाले असते तर खासदारांना लोकांचे प्रश्न सोडवणे सोपे झाले असते. या प्रक्रियेमुळे एससी आणि ओबीसी समाजाचेही आरक्षण वाढले असते, मात्र काँग्रेसने यात अडथळा निर्माण केला आहे," असेही त्यांनी नमूद केले.
परतवाडा 'लव्ह गुरू' प्रकरण: पोलिसांचा तपास महत्त्वाचा
अमरावतीच्या परतवाडा येथील प्रकरणावर भाष्य करताना पालकमंत्री म्हणून बावनकुळे म्हणाले, मी स्वतः या घटनेवर रोज लक्ष ठेवून आहे. प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने फॉरेन्सिक आणि डिजिटल प्रणालीचा वापर करून तपास सुरू आहे. ७ मोबाईल जप्त करण्यात आले असून डिजिटल पुराव्यांचे ऑडिट केले जात आहे. चौकशी भरकटेल असे वक्तव्य कोणीही करू नये; अंतिम अहवाल आल्यावरच सत्य समोर येईल.
अमृता फडणवीस प्रकरण आणि टीसीएस चौकशी
अमृता फडणवीस यांच्याशी संबंधित प्रकरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री स्वतः या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन आहेत. तपासात गोपनीयता पाळणे आवश्यक असून, पोलीस लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन यातील अंतिम निष्कर्षांची माहिती देतील.
पाणी टंचाई: नागरिकांना काटकसरीचे आवाहन
राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीवर बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली. "राज्य सरकारने प्रशासनाला ५०% पाणी कपातीच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, तरच आपण हे संकट थोपवू शकतो, असे आवाहन त्यांनी केले.
रोहित पवार आणि राजकीय नियुक्त्या
रोहित पवारांना सल्ला: शेळके अपघात प्रकरणात रोहित पवारांकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती माध्यमात बोलण्यापेक्षा पोलिसांना द्यावी, उगीच चौकशी भरकटवू नये.
मंत्रिपदाचा निर्णय: मंत्रिपद कोणाला द्यावे किंवा कोणाला ठेवावे, हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार असून योग्य वेळी ते निर्णय घेतील.
Web Summary : Minister Bawankule accuses Congress of obstructing women's reservation, denying political representation. He criticized their opposition to the Nari Shakti Adhiniyam. He also addressed water scarcity and other political issues.
Web Summary : मंत्री बावनकुले ने कांग्रेस पर महिला आरक्षण में बाधा डालने और राजनीतिक प्रतिनिधित्व से वंचित करने का आरोप लगाया। उन्होंने नारी शक्ति अधिनियम के विरोध की आलोचना की। उन्होंने पानी की कमी और अन्य राजनीतिक मुद्दों पर भी बात की।