शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक संस्थांनी संशोधक घडवावेत

By admin | Updated: April 12, 2015 02:29 IST

विदर्भात मुबलक खनिज संपत्ती, जंगल आहे. या संपत्तीचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

नागपूर : विदर्भात मुबलक खनिज संपत्ती, जंगल आहे. या संपत्तीचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शैक्षणिक संस्था, विद्यापीठ आणि बुद्धिजीवी व्यक्तींनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान न देता चांगले संशोधक घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले.झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्यावतीने विदर्भाच्या विकासासाठी जागरुकता घडविण्यासाठी आयोजित ‘विदर्भ विकासाचे स्वप्न : सद्यस्थिती आणि भविष्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी झुलेलाल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष महेश साधवानी होते. व्यासपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. पी. काणे, माजी कुलगुरु डॉ. व्ही. एस. देशपांडे, झुलेलाल इन्स्टिट्यूटचे सचिव वीरेंद्र कुकरेजा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. व्ही. क्षीरसागर, निको समूहाचे अध्यक्ष बसंतलाल शा, नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, झुलेलाल इन्स्टिट्यूटचे संचालक प्रमोद पांपटवार, जय सहजरामानी उपस्थित होते.नितीन गडकरी म्हणाले, विदर्भात मुबलक खनिज संपत्ती आहे. परंतु तरीसुद्धा विदर्भ विकासाच्या बाबतीत मागे आहे. अनेक व्यक्तींनी साधारण बुद्धिमत्ता असताना वेगळा विचार करून यश प्राप्त केले. त्यामुळे अशी वेगळी वहिवाट धुंडाळून विदर्भातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्याची गरज आहे. विदर्भात उपलब्ध कच्च्या मालापासून वीज, वस्त्र, खाद्यपदार्थ, पेय पदार्थ तसेच बायोडिझेल, बायोगॅस तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चरचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला सिनेट सदस्य डॉ. डी. के. अग्रवाल, प्रमोद वैरागडे, प्रवीण बालानी, झुलेलाल इन्स्टिट्यूटचे संचालक गिरीश साधवानी, प्राचार्य एस. एस. लिमये, उपप्राचार्य डॉ. डी. भौमिक आणि विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)