शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सात जणींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: July 25, 2015 03:18 IST

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रगड येथे एका महिलेची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्या प्रकरणी सात महिला आरोपींचा ..

नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रगड येथे एका महिलेची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्या प्रकरणी सात महिला आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. शुक्ला यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. अनिता राजेश ऊर्फ रोशन वनवे (३५), मालती ऊर्फ माला विजय विश्वकर्मा (३५), गीता महादेवराव चिल्लोर (४०), मोहिनी ऊर्फ सुनीता राजेंद्र ठक्कर (४२), जुलिएट ऊर्फ सारसा राजेश जॉन (४५), दुर्गा टायगर राय (३५) आणि ऐश्वर्या राजेश वनवे, अशी आरोपी महिलांची नावे असून त्या सर्व सुरेंद्रगड येथील रहिवासी आहेत. दुर्दैवी पीडित महिला ३१ वर्षांची असून तिची धिंड काढण्याची समाजाला कलंकित करणारी घटना ७ जुलै २०१५ रोजी भरदुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, या प्रकरणाची मुख्य सूत्रधार अनिता वनवे हिला या महिलेचे आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. घटनेच्या दिवशी पीडित महिला आपल्या घरी असताना अनिताने गैरकायद्याची मंडळी जमवून तिच्या घरावर धडक दिली होती. ‘तुझे माझ्या पतीसोबत संबंध आहेत’, असा आरोप करीत अनिता आणि मंडळीने पीडित महिलेला घराबाहेर काढले होते. अनिताने तिला मारहाण करीत आधी स्वत:च्या घरी नेले होते. ओढाताण आणि मारहाण होत असताना तिच्या अंगावरील संपूर्ण कपडे फाटले होते. तिच्या अंगावर केवळ अंतर्वस्त्र होते. तरीही निष्ठूर महिलांनी मारहाण करीत तिला अख्ख्या वस्तीत फिरवले होते. (प्रतिनिधी)व्हिडिओ चित्रिकरणही केलेपीडित महिला ही मदतीसाठी इतर लोकांना विनवणी करीत होती. परंतु ही मंडळी त्यांना धमकावत होती. या महिलेची धिंड काढली जात असतानाच ही मंडळी आपल्या मोबाईलने तिचे व्हिडिओ चित्रिकरणही करीत होते. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, ३५४, ३५४ (ब), ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरण पोलिसात गेल्यापासून सर्व जणी फरार झाल्या आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता प्रकरण गंभीर असल्याने जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. पराग उके यांनी काम पाहिले.