शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत ‘रिहर्सल’

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तब्बल सहा वेळा ‘रिहर्सल’ करून पोलिसांनी अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांच्या संशयास्पद मृत्यूमागे दडलेले गूढ उकलण्याचे प्रयत्न केले.

श्रीकांत खंडाळकर मृत्यूप्रकरण : गूढ उकलण्यासाठी फेकला पुतळानागपूर : जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तब्बल सहा वेळा ‘रिहर्सल’ करून पोलिसांनी अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांच्या संशयास्पद मृत्यूमागे दडलेले गूढ उकलण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर फॉरेन्सिक लॅबला या ‘प्रात्यक्षिका’चे नमुने पाठवून अहवाल मागितला आहे.रविवारी दुपारी जिल्हा न्यायमंदिर परिसरात (इमारतीच्या मागच्या भागात) अ‍ॅड. खंडाळकर यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या खिशात आढळलेल्या ‘सुसाईड नोट’वरून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. मात्र खंडाळकर आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांसह अनेकांनी केला आहे. त्यात कोर्टाच्या सातव्या माळ्याच्या खिडकीजवळ पाय घासल्याचे निशाण पोलिसांना दिसले. त्यांच्या गंभीर आजाराचे अद्याप निदान झाले नाही आणि त्यांचा मोबाईलही अद्याप सापडलेला नाही. या संशयास्पद बाबींमुळे हे प्रकरण कमालीचे रहस्यमय ठरले आहे.सामाजिक दायित्वातून वकिली करणाऱ्या आणि जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अ‍ॅड. खंडाळकर यांचा संशयास्पद मृत्यू अधिवेशनाच्या तोंडावर झाल्यामुळे पोलीसही सर्व शक्यता तपासूनच चौकशी करीत आहेत. सहा वेळा झाले प्रात्यक्षिक या पार्श्वभूमीवर, खंडाळकरांच्या वजनाचा ८० किलोंचा डमी (पुतळा) पोलिसांनी तयार केला. गुन्हेशाखेचे उपायुक्त रंजन शर्मा, पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, पाटील आणि गुन्हेशाखेचा ताफा तसेच फॉरेन्सिकचे विशाल खांबेकर, श्री माळवी, शुक्रवारी सकाळी ९.३० ला जिल्हा न्यायालयाच्या इमारतीजवळ पोहचले. अनेक वकील आणि मान्यवरांसह अ‍ॅड. खांडेकरांचे नातेवाईकही यावेळी उपस्थित होते. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या माळ्यावरून प्रत्येकी दोन वेळा खंडाळकरांचा पुतळा खाली फेकण्यात आला. एकदा आत्महत्येसाठी उडी घेताना कशी स्थिती झाली आणि कुणी धक्का दिल्यास काय स्थिती राहील, कुठे आणि कशा जखमा होतील, त्याचा निष्कर्ष काढण्यासाठी पोलिसांनी तब्बल सहा वेळा डमी खाली फेकला. दोन वेळा तो फाटला. त्यामुळे लगेच शिवून घेत डमीच्या माध्यमातून प्रात्यक्षिक केले जात होते. प्रात्याक्षिकानंतरचे नमुने आणि काही अंदाज नोंदवत तब्बल २ तासानंतर पोलीस पथक तेथून बाहेर पडले. या संदर्भात माहितीसाठी पोलिसांशी संपर्क केला असता सातव्या माळ्यावर पोलिसांना आढळलेल्या अ‍ॅड खंडाळकरांच्या ‘फूट प्रिंट मॅच झाल्या‘, असे पोलिसांनी सांगितले. तज्ज्ञांकडून आलेल्या अहवालानंतरच पुढील निष्कर्ष काढता येईल, असे अधिकारी म्हणाले.(प्रतिनिधी)