शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यापासून हप्ता वसुली

By admin | Updated: July 4, 2014 01:14 IST

बदनामी करण्याची धमकी देऊन सिंचन विभागातील अभियंत्यापासून ५० हजार रुपये हप्ता वसूल करण्यात आला. ही घटना मानेवाडा चौकात घडली. बदनामीच्या भीतीने अभियंत्याने दोन दिवसानंतर

५० हजार घेतले : बदनामीची भीती दाखवून घेतले पैसेनागपूर : बदनामी करण्याची धमकी देऊन सिंचन विभागातील अभियंत्यापासून ५० हजार रुपये हप्ता वसूल करण्यात आला. ही घटना मानेवाडा चौकात घडली. बदनामीच्या भीतीने अभियंत्याने दोन दिवसानंतर या विरोधात तक्रार दाखल केली. मानेवाडा मार्गावरील रहिवासी राम दशपुत्रे सिंचन विभागात अभियंता आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना २९ जूनच्या रात्री १० वाजता एका व्यक्तीने दूरध्वनीवरून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीचा मानेवाडा चौकात अपघात झाल्याची माहिती दिली. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने त्यांना तातडीने मानेवाडा चौकात पोहोचण्यास सांगितले. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून दशपुत्रे मानेवाडा चौकात पोहोचले. मानेवाडा चौकात दशपुत्रे यांना तीन पुरुष आणि एक महिला दिसली.पुरुषांनी त्यांना धमकावून संबंधित महिलेशी संबंध ठेवण्याचा आरोप लावला. परंतु दशपुत्रे महिला आणि पुरुष यांना ओळखतच नव्हते. त्यांनी महिलेला ओळखण्यास नकार देऊन तिच्याशी कुठलेच संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर या महिलेसोबत असलेल्या पुरुषांनी त्यांची पोलिसात चांगली ओळख असल्याची बतावणी करून तक्रार देण्याची धमकी दिली. तक्रार दिल्यानंतर तुमची बदनामी होईल, अशी भीतीही त्यांना दाखविण्यात आली. तक्रार टाळायची असल्यास ५० हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या धमकीमुळे दशपुत्रे घाबरले. त्यांनी पत्नीला फोन करून महत्त्वाच्या कामासाठी ५० हजार रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांच्या पत्नीकडे कमी रक्कम असल्यामुळे त्यांनी मित्रांकडून पैसे उसने घेतले. आरोपींनी दशपुत्रे यांच्या घरी जाऊन पैसे घेतले. घटनेची माहिती कुणालाही दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु ही माहिती दशपुत्रे यांनी पत्नीला सांगितली. बदनामीच्या भीतीने दशपुत्रे यांनी याविरोधात पोलिसात तक्रार दिली नाही. मित्रांनी दबाव टाकल्यामुळे त्यांनी बुधवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)आठवड्यातील तिसरी घटनादशपुत्रे यांच्यासोबत घडलेली घटना ही आठवड्यातील तीसरी घटना आहे. मागील आठवड्यात फ्रेंड्स कॉलनीत विमा एजंट होऊन एका तरुणाला लुटले होते. कोराडीतही एका वेश्येसोबत गेलेल्या एका तरुण व्यापाऱ्याचा मोबाईल आणि ३० हजार रुपये लुटण्यात आले होते. अशा प्रकारच्या घटना नेहमीच होत असून बदनामीच्या भीतीने या घटना पुढे येत नाहीत. या घटनांमुळे शहरात संघटित गुन्हेगारी सक्रिय होत आहे.