शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची जर्नी ब्रेक; बस-ट्रॅव्हल्ससह छोट्या वाहनातून तस्करी

By नरेश डोंगरे | Updated: June 19, 2025 19:22 IST

Nagpur : अंमली पदार्थांसह गोल्ड स्मगलर्सचा नवा फंडा

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेल्वे गाड्यांमधून तस्करीचा पर्दाफाश होण्याची भीती वाढल्याने अंमली पदार्थांसह वेगवेगळ्या प्रकारची तस्करी करणारांनी आता 'जर्नी ब्रेक'चा फंडा अवलंबिला आहे.

रेल्वे गाड्यांमधून गांजा, एमडी, दारूसह गोल्डचीही तस्करी केली जाते. परप्रांतिय मजूर, बालमजूरांचीही तस्करी होते. हवालाची रोकडही ईकडून तिकडे पाठविली जाते. मात्र, अलिकडे रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांसह अन्य तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्यामुळे तस्करीच्या नेटवर्कमध्ये गुंतलेल्या जवळपास सर्वांनीच आता त्यांना गुंगारा देण्यासाठी नवीन शक्कल शोधल्याची संबंधित सूत्रांची माहिती आहे.

रेल्वेगाड्यांमधून सर्वाधिक गांजा तस्करी ओडिशातून केली जाते. आधी मलकनगिरी आणि आता संभलपूरमधून गांजाची खेप घेऊन तस्कर आणि त्यांचे पंटर कोलकाता येथून रेल्वेने निघतात. नागपूर विभागात पकडले जाण्याचा धोका वाढल्याने ते राजनांदगाव, गोंदिया किंवा मधल्या छोट्या रेल्वे स्थानकावर उतरतात. तेथून ते बस किंवा ट्रॅव्हल्समध्ये बसून नागपूरकडे येतात आणि येथून नियोजित ठिकाणी खेप पोहचतात.

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात नकली दारू बनविली जाते. ब्रॅण्डेड कंपन्यांचे लेबल आणि तशाच बाटल्या वापरून ही दारू रेल्वेने पांढूरणा, बैतूल, गोंदियासह वेगवेगळ्या स्थानकावरून नागपूरमध्ये आतापर्यंत यायची. मात्र, अलिकडे नागपूर आधीच्या रेल्वे स्थानकावर उतरून तेथून ही मंडळी नकली दारूंची खेप नागपूर शहरासह आजुबाजुच्या ठिकाणी पोहचवितात.

गोल्ड स्मगलिंग

रायपूर, दिल्ली, अमृतसर आणि जळगाव येथून तस्करीच्या सोन्याची खेप ईकडे तिकडे होत असल्याचे सांगितले जाते. ही मंडळी देखिल नागपूरला धोका होतो, हे लक्षात आल्यामुळे आजुबाजुच्या जिल्ह्यापर्यंतच सोन्याची खेप आणते आणि नंतर टॅक्सी किंवा बस-ट्रॅव्हल्समधून नियोजित ठिकाणी तस्करीचे सोने पोहचवते

हवालाची रक्कम सर्वाधिकमध्ये भारतात नागपूरहून सर्वात जास्त हेरफेर हवालाच्या रकमेची होते. आधी मिठाईच्या बॉक्समधून रक्कम पाठवली जायची. नंतर हवालाच्या रकमेची हेरफेर करण्यासाठी थेट पार्सलचाच वापर सूरू झाला. कापड किंवा अन्य दुसऱ्या कोणत्या चिजवस्तू असल्याचे भासवून रेल्वेच्या पार्सल रुममध्ये ते पार्सल सोडायचे आणि नंतर पाहिजे त्या ठिकाणी ते उतरवून घ्यायचे, असा हवालावाल्यांचा फंडा होता. मात्र, अशा प्रकारे नागपुरातून पाठविण्यात आलेली रक्कम मुंबईच्या पार्सल रुममध्ये पकडली गेल्यामुळे त्यांनीही आता उपरोक्त 'जर्नी ब्रेकचा फंडा' वापरणे सुरू केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेSmugglingतस्करीnagpurनागपूर