लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही वर्षांपासून नागपुरात हुक्का कल्चर मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हुक्का पार्लरचालकांची हिंमत वाढली आहे. सदरमधील डाऊनटाऊन हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली व तेथील मालकासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित हुक्का पार्लरवर तीन महिन्यांत तिसऱ्यांदा धाड टाकण्यात आली आहे. सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
खबऱ्यांच्या माहितीवरून बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास माउंट रोड येथील डाऊनटाऊन हुक्का पार्लरवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी तेथे अनेक ग्राहक हुक्का ओढत बसले होते. पोलिसांकडून तेथील मालक गौरव श्रीराम बोकडे (३३, दुर्गानगर बॅंक कॉलनी, अजनी), तेथील कर्मचारी परेश धनराज सोनटक्के (२०, इतवारी, निकालसमंदिराजवळ) यांच्यासह ग्राहक मनीष देवानंद पाठराबे (२४, नवीन मंगळवारी), अभिषेक प्रवीण मोहाडीकर (२१, कांजी हाऊस, नवीन मंगळवारी), गौरव सचिन पाटील (२०, बिनाकी मंगळवारी), शशांक निखारे (२७, बांग्लादेश, लालगंज), साहील कृष्णराव वेळेकर (२३, तांडापेठ), सलमान कुरेशी उर्फ ईस्लाम कुरेशी (२८, हबीबनगर, टेका), गुरप्रीतसिंग अनोकसिंग सरगोत्रे (२९, भिलगाव), मोहम्मद कादीर मोहम्मद वकील खान (३४, दिवानशहा तकिया, मोमीनपुरा), अशरफ काजी उर्फ जसीम काजी (२६, गांधीबाग) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : Nagpur police raided Downtown Hookah Parlor, a repeat offender, arresting the owner, employees, and customers. Eleven individuals face charges after being caught smoking hookah. This is the third raid in three months.
Web Summary : नागपुर पुलिस ने डाउनटाउन हुक्का पार्लर पर छापा मारा, जो बार-बार अपराध कर रहा था, मालिक, कर्मचारियों और ग्राहकों को गिरफ्तार किया। हुक्का पीते पकड़े जाने पर ग्यारह लोगों पर आरोप लगे। तीन महीने में यह तीसरा छापा है।