शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉलीबॅग चोरी करणाऱ्या आरोपीस रंगेहात अटक : नागपूर आरपीएफची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 22:17 IST

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : दोन लाखांचा मुद्देमाल असलेली प्रवाशाची ट्रॉलीबॅग घेऊन जात असलेल्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात ...

ठळक मुद्देलगेज स्कॅनर मशिनजवळील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : दोन लाखांचा मुद्देमाल असलेली प्रवाशाची ट्रॉलीबॅग घेऊन जात असलेल्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक केली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या लगेज स्कॅनरजवळ घडली.रविवारी रात्री ११ वाजता रेल्वे सुरक्षा दलाचा जवान तरुण कुमार लगेज स्कॅनर मशिनजवळ ड्युटीवर होता. त्याला एक व्यक्ती संशयास्पदरीत्या कत्थ्या रंगाची ट्रॉलीबॅग घेऊन जाताना दिसला. त्याला थांबविले असता तो ट्रॉलीबॅग सोडून पळ काढत होता. त्यावर आरपीएफ जवानाने त्याला पाठलाग करून पकडले. चौकशीत त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने आरपीएफचे जवान शशिकांत गजभिये, मुनेश कुमार यांना बोलावून आरपीएफ ठाण्यात उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, सहायक उपनिरीक्षक बघेल यांच्यासमोर हजर केले. आरोपीने आपले नाव संजय मुन्ना यादव (१८) रा. पवासा, महाकाल, उज्जैन (मध्यप्रदेश) असे सांगितले. ही बॅग प्लॅटफार्म क्रमांक ३ वर आलेल्या छत्तीसगड एक्स्प्रेसमधून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. बॅगमध्ये रोख २५५० रुपये आणि दागिन्यांसह दोन लाखांचा मुद्देमाल होता. कागदोपत्री कारवाईनंतर आरोपीला मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेtheftचोरी