२० हजार शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सुटणार

By Admin | Updated: August 20, 2016 02:40 IST2016-08-20T02:40:58+5:302016-08-20T02:40:58+5:30

साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील काही गावांमध्ये कृषी व गावठाणात १२ तास वीज देण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करावा,

The question of electricity of 20 thousand farmers will be solved | २० हजार शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सुटणार

२० हजार शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सुटणार

१२ तास वीज देण्याचा प्रस्ताव द्या : ऊर्जामंत्री बावनकुळे यांची सूचना
नागपूर : साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील काही गावांमध्ये कृषी व गावठाणात १२ तास वीज देण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. यामुळे या परिसरातील २० हजार शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे.
रविभवन येथे वीजभार नियमनाच्या समस्येबाबत साकोलीचे आमदार बाळा काशीकर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले व २० हजार शेतकऱ्यांची समस्या सांगितली. भारनियमन कमी करण्यासाठी ५२ फिडर बसवावे लागतील, असे यावेळी सांगण्यात आले.
गावठाण व कृषीपंपांना १२ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येणे शक्य आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असेही बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर देशमुख, नगरसेवक संदीप जोशी, रमेश सिंगारे, संदीप जाधव यांनी नागरिकांच्या समस्या पालकमंत्र्यांना सांगितल्या.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शुक्रवार रविभवनमध्ये विविध समस्या सांगण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक भेटले. प्रभाग क्रमांक २४ येथील वायुसेना नगर अंतर्गत असलेल्या हजारीपहाड ते भिवसेन खोरीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत आमदार सुधाकर देशमुख यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. या संदर्भात रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आॅक्टोबर महिन्यातील एक दिवस निश्चित करावा. पोलीस संरक्षण घेऊन अतिक्रमण हटताच रस्त्याच्या रुंदीकरण कामास सुरुवात करावी, अशी सूचना केली.
वांझरा वस्तीतील एसआरए अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या सहनिवासमध्ये पाणी, वीज, व इतर सुविधा तातडीने पुरवाव्या, असे निर्देश महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी नगरसेवक संदीप जोशी उपस्थित होते.
निडमहॅम पार्कमधील महानगर पालिकेची जागा संस्थेला देणे, ग्रामपंचायत डेगमा (बुद्रुक) येथे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या देवजीबुआ देवस्थानाच्या बांधकामासाठी वन विभागाची जागा मिळणे, मानेवाडा बेसा रोडवरील रहिवासी नागरिकांच्या समस्या, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कामगार म्हणून अपंग कोट्यातून शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत नागरिकांनी आपली निवेदने सादर केली. (प्रतिनिधी)

Web Title: The question of electricity of 20 thousand farmers will be solved