शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

२०० बसेसची खरेदी तूर्त रोखली

By admin | Updated: January 7, 2015 01:03 IST

महापालिका प्रशासनाने दिलेला २०० बसेसची खरेदी व वाहतुकीबाबतचा १४४.२३ कोटींचा प्रस्ताव तूर्त थांबविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

मनपा : स्थायी समितीचा निर्णय नागपूर : महापालिका प्रशासनाने दिलेला २०० बसेसची खरेदी व वाहतुकीबाबतचा १४४.२३ कोटींचा प्रस्ताव तूर्त थांबविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.केंद्र सरकारने जेएनएनयूआरएम योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतानाही या प्रस्तावानुसार २० वातानुकूलित तर १८० साध्या बसेस खरेदी करावयाच्या आहेत. यात केंद्र व राज्य सरकारकडून किती निधी मिळणार या संदर्भात स्पष्ट केलेले नाही. तसेच मनपाच्या परिवहन समितीनेसुद्धा या प्रस्तावाला अद्याप मंजुरी दिली नसल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी दिली. प्रस्तावात २०० बसेसची किंमत ९१ कोटी गृहीत धरण्यात आली आहे. तसेच सोमलवाडा, कामठी, पारडी, वाडी,हिंगणा, नागपूर-१ व नागपूर-२ असे ७ डेपो व टर्मिनल प्रस्तावित आहेत. डेपो निर्माण व आवश्यक सुविधा यावर ४५.६० कोटी, प्रवासी निवाऱ्यावर ४.५० कोटी, जीपीएस व अन्य सुविधांवर ३.३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. योजना बंद केली असली तरी केंद्र सरकारकडून मदत मिळेल अशी मनपाला अपेक्षा आहे. सध्या मनपाच्या २४० व व्हीएनआयएल च्या २३० बसेस आहेत. परंतु यातील जेमतेम १५० बसेस शहरात धावत आहेत. (प्रतिनिधी)