शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘टोल बूथ’वर स्थलांतरितांच्या अन्नपाण्याची सोय करा; नितीन गडकरींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 06:20 IST

लॉकडाऊन’मुळे सर्वच शहरांतील कामे, आस्थापना बंद आहेत. कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यांतून किंवा राज्यातून मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणात मजूर व कामगार आले होते.

नागपूर : देशभरात ‘लॉकडाऊन’मुळे हाती काम नसल्याने विविध ठिकाणी मजूर व कामगार मूळ गावी स्थलांतर करत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत या लोकांच्या पोटापाण्याची ‘टोल बूथ’वर सोय होऊ शकते. यासंदर्भात पुढाकार घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या (नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया) अध्यक्षांना दिला आहे. सोबतच ‘टोल ऑपरेटर्स’लादेखील आवाहन केले आहे.

लॉकडाऊन’मुळे सर्वच शहरांतील कामे, आस्थापना बंद आहेत. कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यांतून किंवा राज्यातून मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणात मजूर व कामगार आले होते. हातावर पोट असलेल्यांची कमाईच बंद आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची आबाळ होत आहे. शिवाय ‘कोरोना’चादेखील धोका आहे. त्यामुळेच बरेचजण गावांकडे परतताना दिसून येत आहेत.

गावांकडे स्थलांतरित होणारे मजूर-कामगार यांची ‘टोल बूथ’वर खाण्यापिण्याची सोय होऊ शकते. शिवाय त्यांच्या आरोग्यासंबंधीदेखील सुविधा निर्माण केली जाऊ शकते, अशी सूचना गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या अध्यक्षांना केली आहे. ही संकटाची स्थिती आहे. अशा काळात ‘टोल बूथ आॅपरेटर्स’देखील या आवाहनाला प्रतिसाद देतील व देशबांधवांसाठी आवश्यक त्या सुविधा प्रदान करतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtollplazaटोलनाका