शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी

By admin | Updated: July 26, 2015 03:11 IST

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी वेळेवर चांगली व स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळत नसल्याचे हेही एक कारण आहे.

मुख्यमंत्री फडणवीस : अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेसचा पदग्रहण सोहळानागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी वेळेवर चांगली व स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळत नसल्याचे हेही एक कारण आहे. आत्महत्या थांबविण्यासाठी आणि ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारसोबतच तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य संघटना, कार्पाेट्सला संयुक्त रुपाने प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.अ‍ॅकेडमी आॅफ मेडिकल सायन्सेसच्या (एएमएस) पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून एम्स. नवी दिल्लीचे पल्मोनरी मेडिसीन विभागाचे प्रमुख व पद्मश्री डॉ. आर. गुलेरिया, मुंबईचे प्रसिद्ध इन्टरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. डी. पहलाजानी, एएमएसचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. व्ही.एम. भालेराव, डॉ. राजू खंडेलवाल, पूर्व अध्यक्ष सुनील अंबुलकर, डॉ. हरीश वरभे, सचिव डॉ. निर्मल जयस्वाल उपस्थित होते. विशेष रुपाने डॉ. बी.जे. सुभेदार कार्यक्रमात सहभागी झाले होते. फडणवीस म्हणाले, ज्या गतीने आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान व औषधे येत आहेत, त्या गतीने आरोग्य सेवा स्वस्त आणि सहज उपलब्ध झालेली नाही. भारत विकसनशिल देश आहे. यामुळे अर्थसंकल्पात कमी बजेटची तरतूद करणे शक्य नाही. ग्रामीण भागातील इस्पितळांमध्ये मनुष्यबळांची संख्या फार कमी आहे. ही दूर करण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ५०० डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली, परंतु २०० डॉक्टरच उपलब्ध होऊ शकले. सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामीण भागात, गोरगरीब व तळागाळातील लोकांना वैद्यकीय सेवा पुरवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. गुलेरिया म्हणाले, रोज नवीन आषधे व तंत्रज्ञान येत आहे. यामुळे डॉक्टरांनी अपडेट राहणे आवश्यक झाले आहे. डॉ. पहलाजानी म्हणाले, नागपूरच्या आरोग्य क्षेत्रात कार्पाेरेट इस्पितळाची संस्कृति विकसीत झालेली नाही. यासाठी येथील डॉक्टर कौतुकाचे पात्र आहेत.येथे दिल्ली, मुंबईसारखीच सेवा उपलब्ध आहे, असे म्हणून त्यांनी नव्या चमूला शुभेच्छा दिल्या. डॉ. भालेराव म्हणाले की, जग बदलत आहे,आपणासही बदलण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी वर्षभरातील प्रस्तावित कार्यक्रम-उपक्रमांची माहिती दिली. संचालन डॉ. कल्पना दाते व डॉ. राजेश बारोकर यांनी केले. आभार नवनियुक्त सचिव डॉ. निर्मल जायस्वाल यांनी मानले. (प्रतिनिधी)