शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडे हत्याकांडाचा निषेध

By admin | Updated: November 4, 2014 01:03 IST

जवखेडे (पाथर्डी) येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेसतर्फे कॅण्डल मार्च काढण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आरोपीला अटक करण्याची मागणी नागपूर : जवखेडे (पाथर्डी) येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेसतर्फे कॅण्डल मार्च काढण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यात आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आली. गेल्या २० आॅक्टोबर रोजी जि. अहमदनगर ता. पाथर्डी येथील जवखेडे या गावातील १९ वर्षांचा हुशार मुलगा सुनील जाधव, त्याचे वडील संजय जाधव व आई जयश्री जाधव यांची झोपेत अमानुषपणे हत्या करण्यात आली. जातीय मानसिकतेतून करण्यात आलेल्या या हत्याकांडामुळे एकूणच समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या हत्याकांडातील आरोपीला तातडीने अटक न झाल्याने हा असंतोष उफाळून येत आहे. सोमवारी काँग्रेसतर्फे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांना मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या हत्याकांड प्रकरणी काँग्रेस अतिशय गंभीर असून आंदोलनाचा पहिला भाग म्हणून निवेदन सादर करण्यात आले आहे. आरोपीला तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिला. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय ते संविधान चौक दरम्यान कॅण्डल मार्च काढण्यात आला. संविधान चौकात पोहोचल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. आंदोलनात यशवंत कुंभलकर, अभिजित वंजारी, नितीश ग्वालबंशी, जयंत लुटे, संदीप सहारे, कुणाल राऊत, दीपक कापसे, ईश्वर बर्डे, अरुण डवरे, सिंधू उईके, बंडोपंत टेंभुर्णे, प्रशांत धवड, भावना लोणारे, ममता गेडाम आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)