नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात चार कैद्यांनी गोंधळ घालत कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत जखमी केले. मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे. मागील काही काळापासून कारागृहात घडत असलेल्या अशा घटनांमुळे एकूण कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारागृहातील अधिकाऱ्यांचा वचक संपला का, असा सवालदेखील उपस्थित करण्यात येत आहे.संदीप रमेश काळे (४२) असे जखमी झालेल्या कारागृहातील कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर आदर्श ऊर्फ पप्पी रमेश खरे (बारा सिग्नल, बोरकरनगर), रजत राजा तांबे (बारा सिग्नल, बोरकरनगर), भारत राजेंद्र पंडित (इंदिरानगर), ऋषिकेश मनोज पेंडले (मेकोसाबाग) हे आरोपी कैदी आहेत. हे सर्व जण न्यायाधीन कैदी आहेत. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बडीगोल येथील बॅरेक क्रमांक १० जवळ अचानक गोंधळ सुरू झाला. तेथे कैदी अभय तिवारी व शैलेश बेले यांच्यात शाब्दिक वाद सुरू होता. संदीप काळे हे तुरुंग अधिकारी संतोष मदने यांच्यासोबत तिथे गेले. दोन्ही कैद्यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांना ते वरिष्ठ तुरुंग रक्षक जोगदंडे यांच्याकडे घेऊन जात होते.अचानक चारही आरोपी कैदी बडीगोल विभागाच्या यार्ड क्रमांक एकच्या फाटकाजवळ उग्र होत आले. त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत ‘साहेबालादेखील घे आणि बाबालादेखील बोलव, कुणालाही सोडायचे नाही’, असे म्हणत त्यांनी काळे यांना पकडले. ‘तू गेट का बंद केले’, असे म्हणत त्यांना बुक्क्यांनी मारहाण केली. आवाज ऐकून संतोष मदने तेथे धावत गेले व ते कैद्यांना समजावून सांगत होते. मात्र, कैद्यांनी त्यांनादेखील शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली. दरम्यान, एका कैद्याने काळे यांना धातूच्या वस्तूने मारले व त्यात त्यांच्या करंगळीतून रक्त येऊ लागले. त्यांना तातडीने इस्पितळात पाठविण्यात आले व आरोपी कैद्यांना ताब्यात घेण्यात आले. काळे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधीक्षकांच्या ‘राउंड’नंतर लगेच हल्लासकाळी नेहमीप्रमाणे कारागृह अधीक्षकांचा ‘राउंड’ होता. सकाळी १० वाजता त्यांनी बडीगोल विभागात पाहणी केली व तेथून ते कारागृहाच्या किचनच्या बी.सी. बॅरेककडे रवाना झाले. ते गेल्यावर लगेच हा गोंधळ झाला व चारही कैद्यांनी काळे यांच्यावर हल्ला केला.
Web Summary : Four inmates rioted in Nagpur Central Jail, severely injuring a guard. The incident raises concerns about prison control after a verbal argument escalated, leading to the assault. Police have filed charges against the inmates involved in the attack following the superintendent's round.
Web Summary : नागपुर मध्यवर्ती जेल में चार कैदियों ने हंगामा किया और एक प्रहरी को गंभीर रूप से घायल कर दिया। इस घटना से जेल प्रशासन पर सवाल उठ रहे हैं। कहासुनी के बाद हमला हुआ। पुलिस ने शामिल कैदियों के खिलाफ मामला दर्ज किया।