शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आधीचे ६० टक्के टार्गेट पूर्ण, १८ वर्षावरील १६ लाख लोकांना मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या २८ लाखांच्या आसपास आहे. यात ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या ७ लाखांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या २८ लाखांच्या आसपास आहे. यात ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या ७ लाखांच्या आसपास आहे. यातील जवळपास ३ लाख ९० हजार लोकांना लसीचा पहिला डोज दिला आहे तर दुसरा डोस ४४ हजार ४७१ लोकांनी घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षापुढील सर्वांना लस दिली जाणार आहे. नागपूर शहरात अशा लोकांची संख्या १९ लाखांहून अधिक आहे. या आधीचे टार्गेट ६० टक्केहून अधिक पूर्ण झाले आहे. त्यात लसीचा पुरेसा साठा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने लसीकरणावर परिणाम झाला आहे. सध्या २० हजार डोस उपलब्ध आहे. १८ वर्षावरील सर्वांना लस द्यावयाची झाल्यास केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा वाढवावा लागेल. सोबतच मनपाला लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी लागणार आहे.

....

तर दररोज द्यावे लागतील २७ हजार डोस

१८ वर्षावरील सर्वाना लस दिली जाणार आहे. नागपूर शहरात या वयोगटातील लोकांची संख्या १९ लाख ७८७ इतकी आहे. यातील ३ लाख ९० हजार लोकांना लस दिली आहे. उर्वरित १६ लाख १०हजार लोकांना लस देण्याचे टार्गेट सहा महिन्यात पूर्ण करावाचे झाल्यास दररोज २७ हजार लोकांना लस द्यावी लागेल.

...

शहराची लोकसंख्या - २८ लाख

१८ ते ४५ वयोगटातील लोकसंख्या -१९ लाख ७८७

स्त्री-९२०७१२

पुरुष-९७९९९५

...

तीन दिवसाचा साठा

शहरातील १२२ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रांची क्षमता दररोज २० हजाराहून अधिक आहे. परंतु लसीचा पुरेसा साठा नसल्याने मागील काही दिवसात लसीकरण कमी होत आहे. मागील काही दिवसापूर्वी १६ हजारांवर गेलेला लसीकरणाचा आकडा या आठवड्यात ७ हजारांवर आला आहे. त्यानुसार तीन दिवस पुरेल इतकाच लस साठा उपलब्ध आहे.

...

४५ पेक्षा जास्त वयाचे ६० टक्केहून अधिक लसीकरण

शहरातील लोकसंख्या २८ लाखांच्या आसपास आहे. यात ४५ वर्षाहून अधिक वय असलेल्यांची संख्या ७ लाख आहे. यातील ३ लाख ९० हजार लोकांना लसीचा पहिला डोज दिला आहे. याचा विचार करता जवळपास ६० टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा पुरेसा साठा नाही. सोबतच नागरिकांचाही अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही.

...

१.५१ लाख ज्येष्ठांचे लसीकरण

नागपूर शहरात ६० वर्षावरील नागरिकांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. परंतु आजवर १ लाख ५१ हजार ज्येष्ठांनी लसीकरण केले आहे. लसीकरणाला ज्येष्ठांचाही अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

....

४४४७१ जणांनी घेतला दुसरा डोस

पहिला डोस घेतल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी दुसरा डोस दिला जातो. आजपर्यंत४४ हजार ४७१ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. पुढील काही दिवसात ही संख्या वाढणार आहे.

...

लसीकरण केंद्रात वाढ करावी लागेल

नागपूर शहरात सध्या १२२ लसीकरण केंद्र सुरू आहे. दररोज २४ ते २५ हजार डोस देण्याची क्षमता आहे. १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यासाठी लस पुरवठ्यासोबतच

गरज भासल्यास शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे.