शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवलेंचा भाचा असल्याची बतावणी, वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली १८ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:54 IST

Nagpur : पोलिस निरीक्षकांसमोर मोठमोठ्या बाता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा भाचा असल्याची बतावणी करत मंत्रालयामार्फत एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका ठकबाजाने पालकाला १८ लाखांचा गंडा घातला. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मोहन व्यंकट खोब्रागडे (५०, भारतनगर, वडधामना) असे तक्रारदाराचे नाव आहे. तर, निखील विश्वनाथ कांबळे (वय ४०, फार्च्यून अपार्टमेंट, मनिषनगर) व त्याची पत्नी शीतल कांबळे, अशी आरोपींची नावे आहेत. मोहन खोब्रागडे सेवानिवृत्त सैनिक असून, ते वायरलेस विभागात २०१२ पासून कार्यरत आहेत. त्यांच्या मुलीला २०२२ मध्ये एमबीबीएस करायचे होते. मात्र, गुण कमी पडल्याने त्यांनी तिला रशियात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्या कालावधीत त्यांची भेट आरोपी निखीलसोबत झाली. त्याने मुलीला रशियाला का पाठविता, मंत्रालयाच्या माध्यमातून नागपुरातील लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करवून देतो, असा दावा केला. त्याबदल्यात ३० लाख रुपये लागतील, असे तो म्हणाला. अखेर २७ लाखांत सौदा सौदा ठरला. ऑक्टोबर २०२२ मध्ये खोब्रागडे यांनी निखीलच्या घरी जाऊन १५ लाख रोख व मुलीची कागदपत्रे दिली.

सिक्युरिटी म्हणून निखीलने खोब्रागडे यांना कोरा धनादेशदेखील दिला. काही दिवसांनी खोब्रागडे यांच्या घरी एक फोन आला व प्रवेशाचे काम झाले आहे, तुम्ही निखीलशी संपर्क साधा, असे समोरील व्यक्तीने सांगितले. निखीलच्या सांगण्यावरून खोब्रागडे यांनी ३.१३ लाख त्याच्या खात्यात वळते केले.

मात्र, त्यानंतर प्रवेश झालाच नाही. उशीर झाल्याने २०२३ च्या सत्रात प्रवेश होईल, असे आरोपीने त्यांना सांगितले. मात्र, प्रवेश झालाच नाही व आरोपी दाम्पत्य घर सोडून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खोब्रागडे यांनी तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षकांसमोर मोठमोठ्या बाताखोब्रागडे हे स्वतः पोलिस वायरलेस विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या परिचयातील पोलिस निरीक्षक अशोक गेडाम यांनादेखील त्यांनी माहिती दिली होती. गेडाम यांच्यासोबत ते आरोपीच्या घरी चर्चेसाठीदेखील गेले होते. त्यावेळी आरोपीने त्यांच्यासमोर मोठमोठ्या बाता मारल्या होत्या. खोब्रागडे यांनी त्यांना रोख १५ लाख रुपयेदेखील त्यांच्यासोबत जाऊनच दिले होते. वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर अनेक जण गोरखधंदा चालवतात आणि याबाबत पोलिसांतच अनेकदा गुन्हे दाखल होतात. मात्र, तरीदेखील पोलिसच ठकबाजाच्या जाळ्यात अडकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरfraudधोकेबाजी