शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉलिश गॅंग’ परत सक्रिय, बेलतरोडीत महिलेला घातला गंडा

By योगेश पांडे | Updated: April 28, 2023 16:43 IST

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : दागिन्यांना पॉलिश करत चमकविण्याचा दावा करून नागरिकांच्या घरात शिरून गंडा घालणारी ‘पॉलिश गॅंग’ परत सक्रिय झाली आहे. पूर्व विदर्भ, मध्यप्रदेशात गुन्हे केल्यानंतर गॅंगच्या सदस्यांनी परत नागपुरातील घरे ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे. बेलतरोडीत दोन दिवसांअगोदर एका महिलेला घरात शिरून फसविण्यात आल्याची घटना घडली आहे.

वैशाली योगेश शेंडे (परसोडी, वर्धा मार्ग) या २५ एप्रिल रोजी घरी एकट्याच होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन व्यक्ती बॅग घेऊन आले व सोने तसेच तांब्याचे भांडे चमकावून देण्याचे लिक्विड विकत असल्याचे त्यांनी सांगितले. शेंडे यांनी लहान मुलीच्या पायातील चांदीचे पैंजण दिले. ती त्यांनी एका लिक्विडमध्ये टाकली व काही वेळातच ती चमकायला लागली. यावरून शेंडे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनी आरोपींना सोन्याचे कानातील टॉप्स व मंगळसूत्र दिले. आरोपींनी ते एका लिक्विडमध्ये टाकले व त्यांना पाणी गरम करण्यास सांगितले.

त्या पाणी गरम करत असताना एका आरोपीने पाण्यात हळद टाकली व लिक्विडमधून दागिने काढत गरम पाण्यात टाकण्याचे हावभाव केले. प्रत्यक्षात त्याने हातचलाखी केली व दागिने पाण्यात टाकलेच नाही. त्यांनी शेंडे यांना गॅसची स्पीड वाढविण्यास सांगितले व ते बाहेरच्या खोलीत आले. शेंडे यांना संशय आला म्हणून त्यांनी भांड्यात हात टाकून पाहिला असता त्यात दागिने नव्हते. त्या धावत बाहेर आल्या असता आरोपी फरार झाले होते. त्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत आरोपी नजरेच्या दूर निघून गेले होते. त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली व पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर