शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना खासगी वकील नियुक्तीचे अधिकार

By admin | Updated: May 18, 2015 02:46 IST

सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या व संवेदनशील प्रकरणांमध्ये न्यायालयात शासनाच्यावतीने बाजू

नागपूर : सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या व संवेदनशील प्रकरणांमध्ये न्यायालयात शासनाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी हुशार व अनुभवी खासगी वकील नियुक्त करण्याचे अधिकार यापुढे पोलिसांना राहणार आहेत. उच्च न्यायालयाने यापूर्वी अनेकदा शासनाच्या पॅनलमधील वकिलांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काही वकिलांना कायद्यातील मूलभूत तरतुदीही माहीत नसल्याचे आढळून आल्यानंतर शासनाची कानउघाडणी केली होती. ही बाब लक्षात घेता शासनाने शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांना खासगी वकील नियुक्त करण्याचे अधिकार देणे हा त्याचाच एक भाग आहे.काही प्रकरणे सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील असतात. या प्रकरणांच्या न्यायालयीन घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. अशावेळी शासनाची बाजू बळकट नसल्यास त्याचा लाभ आरोपीला मिळतो. आरोपी बक्कळ रक्कम खर्च करून तज्ज्ञ व अनुभवी वकील उभे करतात. ते सरकारी वकिलांवर वरचढ ठरतात. परिणामी आरोपी किरकोळ बाबींमुळे संशयाचा लाभ मिळून निर्दोष सुटतात. याचा गंभीर परिणाम समाजमनावर होतो. यामुळे शासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.या निर्णयानुसार पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील संवेदनशील प्रकरणांसाठी खासगी वकिलांचे पॅनल तयार करता येणार आहे. या वकिलांना शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार मानधन देण्यात येईल. हे वकील संवेदनशील प्रकरणांमध्ये न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहतील. परंतु, विशेष सरकारी वकील नियुक्त करताना खटला संवेदनशील असल्याची खातरजमा पोलिसांना करावी लागणार आहे.(प्रतिनिधी)