शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पीएम केअर फंड प्रकरणात गुणवत्तेवर बाजू मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:15 IST

PM Care Fund case , High court, nagpur news पीएम केअर फंडसंदर्भातील पुनर्विचार याचिकेमध्ये येत्या ७ डिसेंबर रोजी गुणवत्तेवर बाजू मांडण्यासाठी तयार राहावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी केंद्र सरकारला दिले.

ठळक मुद्देहायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश, ७ डिसेंबरला पुढील सुनावणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : पीएम केअर फंडसंदर्भातील पुनर्विचार याचिकेमध्ये येत्या ७ डिसेंबर रोजी गुणवत्तेवर बाजू मांडण्यासाठी तयार राहावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी केंद्र सरकारला दिले. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

ही याचिका अ‍ॅड. अरविंद वाघमारे यांनी दाखल केली आहे. त्यांची पीएम केअर फंडसंदर्भात विविध चार मागण्या करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गेल्या २७ ऑगस्ट रोजी फेटाळून लावली. त्या निर्णयावर पुनर्विचार व्हावा असे वाघमारे यांचे म्हणणे आहे. पीएम केअर फंडमध्ये किती रक्कम जमा झाली आणि आतापर्यंत फंडमधील रकमेचा कशाकरिता उपयोग करण्यात आला याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, पीएम केअर फंडच्या विश्वस्त मंडळातील तीन रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, त्यापैकी दोन विश्वस्त विरोधी पक्षांमधून निवडण्यात यावे आणि फंडच्या लेखा परीक्षणाकरिता नवी दिल्ली येथील मे. सार्क असोसिएट्सची नियुक्ती करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, या चार मागण्यांचा जनहित याचिकेत समावेश होता. उच्च न्यायालयाने संबंधित निर्णयाद्वारे सर्व मागण्या अवैध ठरवल्या. पीएम केअर फंड हा नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणी केलेला धर्मादाय ट्रस्ट आहे. या फंडची स्वत:ची घटना असून त्यानुसार फंडचे संचालन केले जाते. फंडमध्ये जमा होणाऱ्या व फंडमधून खर्च होणाऱ्या रकमेमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नोंदणी कायद्यामध्ये प्रभावी यंत्रणेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे फंडसंदर्भात कुणाला काहीही आक्षेप असल्यास ते या कायद्यातील यंत्रणेचा उपयोग करू शकतात. जनहिताच्या प्रत्येक प्रश्नाकरिता उच्च न्यायालयाचे दार ठोठावले जाऊ शकत नाही. न्यायालयाकडून संपूर्ण देशाचे प्रशासन चालविण्याची अपेक्षा करता येणार नाही. तसेच, या प्रकरणात घटनात्मक व वैधानिक तरतुदींचे प्रचंड उल्लंघन झाल्याचे कोणतेही मुद्दे याचिकाकर्त्याने रेकॉर्डवर आणले नाहीत, असे उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर