शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल, दोन दुचाकी जप्त

By admin | Updated: May 26, 2017 02:46 IST

शहरातील गणेशनगरस्थित अमित ज्वेलर्समध्ये रविवारी (दि. १४) दुपारी टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोडाप्रकरणात

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हान : शहरातील गणेशनगरस्थित अमित ज्वेलर्समध्ये रविवारी (दि. १४) दुपारी टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोडाप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना रविवारी (दि. २१) मध्यरात्री अटक केली. या पाचही दरोडेखोरांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी गुरुवारी (दि. २५) सकाळी एक पिस्तूल आणि दोन मोटरसायकली जप्त केल्या. या दोन्ही मोटरसायकली रामटेक येथील विद्यार्थ्यांच्या असून, दरोडेखोरांनी काम असल्याची बतावणी करीत त्यांना मागितल्या होत्या. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने योगेश फुलसिंग यादव (२५, रा. कन्हान), आर्येन ऊर्फ नीतेश मुन्नेलाल राठोर (२४, रा. कन्हान), जितेंद्र ऊर्फ भुरू मारुती धोटे (३८, रा. रामनगर, गोंदिया), समीर रमाकांत लुटे (२३, रा. रामटेक) व प्रफुल्ल ऊर्फ पीयूष अंबादास जांगडे (२५, रा. रामटेक) या पाच जणांना अटक केली. सुरुवातीला त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि २४ हजार रुपये रोख रकमेसह अन्य साहित्य जप्त केले होते. शिवाय, न्यायालयाने या पाचही जणांना शुक्रवारपर्यंत (दि. २६) पोलीस कोठडी सुनावली होती.दरम्यान, पोलिसांनी या पाचही जणांची कसून चौकशी केली. त्यात त्यांनी घटनेच्यावेळी वापरलेले अन्य एक पिस्तूल आणि दोन मोटरसायकली जप्त केल्या.