शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप दररोज सुरू राहणार : अफवांनी उसळली रात्री गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 22:55 IST

पंप बंद राहणार असल्याच्या अफवांमुळे लोकांनी पेट्रोल भरण्यासाठी रात्री शहरातील विविध पंपांवर एकच गर्दी केली होती.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पेट्रोल जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप दररोज सुरू राहणार असल्याची माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी लोकमतशी बोलताना दिली. पेट्रोल पंप नियमित सुरू राहणार असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. पंप बंद राहणार असल्याच्या अफवांमुळे लोकांनी पेट्रोल भरण्यासाठी रात्री शहरातील विविध पंपांवर एकच गर्दी केली होती.कोरोना विषाणूचा होणारा संसर्ग पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट, पानठेले ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश बुधवार सायंकाळी ५ वाजेपासून लागू झाले आहेत. पण जिल्ह्यातील पेट्रोल पंप, किराणा दुकाने, दूध व भाजी दुकाने आणि आवश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप सुरू राहण्यासंदर्भात सर्व पेट्रोल पंप संचालकांना फलक लावण्याच्या सूचना स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आल्या असून, त्याबाबत विशेष सिस्टिमद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वीच शाळा, महाविद्यालये, मॉल, जीम ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. पण बुधवारी अफवांमुळे शहरातील ईश्वरनगर, जट्टेवार सभागृह, नंदनवन, गुरुदेवनगर, ग्रेट नाग रोड, मेडिकल चौक, बसवेश्वर पुतळा, वर्धा रोड, सीताबर्डी याशिवाय सर्वच पंपांवर वाहनचालकांची गर्दी दिसून आली.काही पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. पंप बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले नाहीत. पेट्रोल आवश्यक सेवेंतर्गत असल्याने बंद राहणार नाहीत, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.अमित गुप्ता,अध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर