शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका

By योगेश पांडे | Updated: August 29, 2024 20:54 IST

भाजपचा आरोप : लाडकी बहीण विरोधातील याचिकेमुळे राजकीय पारा तापला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाडकी बहीणसह विविध योजनांना उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकेमुळे आता राजकारण तापले आहे. भाजपने या मुद्द्यावरून कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. यात याचिका करणारा व्यक्ती कॉंग्रेस कार्यकर्ता असून जाणुनबुजून ही याचिका करण्यात आली आहे. कॉंग्रेसचा महिलाविरोधी चेहरा उघड झाला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

अनिल वडपल्लीवार यांनी या योजनेविरोधात याचिका दाखल केली आहे. अशा योजनांमुळे राज्याचे आर्थिक आरोग्य खराब होत असून निवडणूकीत पावित्र्य नष्ट होत आहे. या योजनेचा निर्णय असंवैधानिक व मनमानी पद्धतीचा असल्याचे घोषित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी हा प्रकार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याकडूनच करण्यात आल्याचा दावा केला आहे. अनिल वडपल्लीवार कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनिल केदार यांचा कार्यकर्ता आहे. लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने कॉंग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून वडपल्लीवारने लाडकी बहिण योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहेत, असा आरोप कुकडे यांनी केला आहे.

काँग्रेसने यापूर्वीही लाडकी बहिण योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती . आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे. महायुती सरकारच्या या योजनेचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. या योजनेमुळे महिला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वारंवार याबाबत अपप्रचार करण्यात येत आहे, असा दावा कुकडे यांनी केला.

सोशल माध्यमांवरदेखील आक्रमकभाजपच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसविरोधात पोस्ट टाकण्यास सुरुवात झाली आहे. अनिल वडपल्लीवार यांचे कॉंग्रेस नेत्यांसोबतचे फोटो पोस्ट करण्यात येत असून काँग्रेसकडून महिलांविरोधात भूमिका घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस