शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर कचरा टाक ल्यास दंडात्मक कारवाई

By admin | Updated: September 5, 2016 02:50 IST

देशभरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. महानगरपालिकेतर्फे नागनदी, अंबाझरी तलाव परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

महापौरांचे निर्देश : स्वच्छता मोहिमेचा आढावानागपूर : देशभरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. महानगरपालिकेतर्फे नागनदी, अंबाझरी तलाव परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याची दखल घेत मुंबई व दिल्ली येथे गौरव करण्यात आला. नागपूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत २५९ वरून २० व्या क्रमांकावर आले आहे. परंतु यावरच थांबून चालणार नाही. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पहिल्या दहा शहरात नागपूरची गणना व्हावी, यासाठी स्वच्छतेसाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी रविवारी दिले. गणेशोत्सव निमित्ताने शहरातील साफसफाई आणि गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यासाठी महाल येथील महानगरपालिकेच्या राजे रघुजीराव भोसले सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमहापौर सतीश होले, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, वैद्यकीय सेवा समितीचे सभापती देवेंद्र मेहर, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, जयंत दांडेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, कनक रिर्सोसेसचे वरिष्ठ व्यवस्थापक कमलेश शर्मा, झोन अधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागातील कर्मचारी शहराचा चेहरा आहे. त्यांच्याच प्रयत्नांनी शहराला स्वच्छतेचे पुरस्कार मिळालेले आहेत. सध्या गणेशोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे. त्यानंतर नवरात्र व अन्य महोत्सव विचारात घेता शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प करा. २ आॅक्टोबरपासून स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक मंडळासह सर्वांचा सहभाग यात आवश्यक आहे. सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करून आहे त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपक्रम राबवा, असे आवाहन दटके यांनी केले. प्रभागनिहाय कार्यरत स्वच्छता निरीक्षक, जमादार, ऐवजदार यांचा आढावा घेण्यात आला. स्वच्छता निरीक्षकांना आपली जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडता यावी, यासाठी त्यांना आकर्षक गणवेश व पोलीस विभागाचे अधिकार देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर २० व्या क्रमांकावर आले आहे. परंतु जानेवारी २०१७ मध्ये सर्वेक्षण होईल. तेव्हा ५०० शहरे स्पर्धेत राहतील. छोटी शहरे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगराध्यक्ष व नागरिक पुढाकार घेतात. या स्पर्धेत नागपूर शहराला टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन श्रावण हर्डीकर यांनी केले. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावा. रस्त्यावर कचरा टाकणारे, बांधकामाचा मलबा, औद्योगिक कचरा, हॉटेलचा कचरा उघड्यावर टाकल्यास कारवाई करा. २ आॅक्टोबरचे अभियान यशस्वी करा असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)