शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पंडित प्रभाकर धाकडे यांचा सत्कार

By admin | Updated: October 26, 2016 03:06 IST

सूरमणी पंडित प्रभाकर धाकडे यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी साई सभागृहात त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व कलावैभवचे संयुक्त आयोजननागपूर : सूरमणी पंडित प्रभाकर धाकडे यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी साई सभागृहात त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व कलावैभव संस्थेतर्फे आयोजित या सत्कार सोहळ्यात स्वरप्रवाह हा विशेष सांगितिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दिलीप डबीर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. प्रमोद मुनघाटे, सामाजिक कार्यकर्ते विजय मेश्राम, माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, मोहम्मद सलीम उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्या संकल्पनेतून आयोजित या समारंभात पंडित प्रभाकर धाकडे व त्यांच्या पत्नी उर्मिला धाकडे यांचा शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आ. डॉ. मिलिंद माने यांनी धाकडे यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. डॉ. नितीन राऊत यांनी गुरुजींच्या व्हायोलिनचे सूर असेच निनादत राहावे, अशा शुभेच्छा देत त्यांना पद्मश्री मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. दिलीप डबीर यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणातून गुरुजींच्या सुरेल व्हायोलिनसह रंगलेल्या कीर्तन महोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला. पंडित प्रभाकर धाकडे यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सत्कार समारंभाचे संचालन अशोक जांभुळकर यांनी केले. यानंतर गुरुजींच्या संगीतबद्ध गीत-गझलांचा स्वरप्रवाह हा सांगितिक कार्यक्रम सादर झाला. यात छाया वानखेडे, शाम जैन, मंजिरी वैद्य-अय्यर, रसिका करमाळेकर, मोहिनी बरडे, धनश्री बुरबुरे, पारिजात काळीकर, शेफाली चौरसिया, मोनिका देशमुख यांनी गीते सादर केली. पंडित धाकडे, भूपेश सवाई, श्रीकांत पिसे, प्रमोद बावणे, अरविंद उपाध्ये, सुभाष वानखेडे, मन्ना डॉन हे सहवादक होते. निवेदन सय्यद शिरीन यांनी केले. (प्रतिनिधी)