शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी विरोधक आक्रमक

By admin | Updated: December 16, 2015 03:11 IST

महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले आहे.

विधान परिषदेत सभात्याग : सरकार आरक्षण देण्यासाठी गंभीर असल्याची ग्वाहीनागपूर : महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले आहे. परंतु राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने जाणीवपूर्वक हा अध्यादेश कायद्यात रुपांतरित केला नाही, असा आरोप करीत विरोधी सदस्यांनी मंगळवारी विधान परिषदेत सरकार विरोधात नारेबाजी करीत सभात्याग केला. ख्वाजा बेग व जयंतराव जाधव यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता. उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना मुस्लीम समाजाला शिक्षणातील आरक्षण कायम ठेवले होते. परंतु सरकारने या संदर्भात कोणतेही पाऊ ल उचललेले नाही. सरकार जातीयवादी असल्याचा आरोप बेग यांनी केला. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले. परंतु मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. सरकारने जाणीवपूर्वक मुस्लीम समाजाला आरक्षणपासून वंचित ठेवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. विरोधी सदस्यांनीही मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली. मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार गंभीर आहे. म्हणूनच सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला होता. परंतु उच्च न्यायालयाने याबाबत अंतरिम निर्णय दिलेला आहे. सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर अंतिम निर्णय झाल्यानंतर घटनात्मक बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. उपरोक्त अध्यादेश अस्तित्वात असेपर्यत उक्त कालावधीतील शासकीय व अनुदानीत शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी व शासकीय सेवेसाठी दिलेले आरक्षण अबाधित ठेवण्यात आल्याची माहिती खडसे यांनी दिली. (प्रतिनिधी)