दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:02+5:302021-06-24T04:08:02+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक लागली. त्यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला ...

One dies in two-wheeler accident | दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक लागली. त्यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना नक्षी मार्गावर बुधवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास घडली.

दिलीप गाेपाल देशमुख (५५, रा. ताताेली, ता. भिवापूर) असे मृताचे नाव असून, सुरेश चाैधरी (रा. हत्तीबाेडी, ता. भिवापूर) असे जखमीचे नाव आहे. मृत दिलीप देशमुख हे आपल्या एमएच-४०/एम-६३८७ क्रमांकाच्या दुचाकीने भिवापूर येथून ताताेली येथील शेतात जात हाेते तर सुरेश चाैधरी हे आपल्या सहकाऱ्यासह एमएच-३१/डीजे-००८० क्रमांकाच्या दुचाकीने मांगली येथून अंत्यविधी आटाेपून शेतीपयाेगी साहित्य खरेदीसाठी भिवापूरला येत हाेते. दरम्यान, नक्षी मार्गावर दुचाकी अनियंत्रित झाल्याने दाेन्ही दुचाकींची समाेरासमाेर धडक लागली. यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने दिलीप देशमुख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुरेश चाैधरी हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृत व जखमीला भिवापूर ग्रामीण रुग्णालयात हलविले. जखमीवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून, ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्या मार्गदर्शनात पाेलीस तपास करीत आहेत.

===Photopath===

230621\img-20210623-wa0097.jpg

===Caption===

घटनास्थळावरील अपघातग्रस्त दुचाकी व बघ्यांची गर्दी

Web Title: One dies in two-wheeler accident