अधिकाऱ्यांनी केली शाळेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:55+5:302021-01-04T04:07:55+5:30

वाडी : नागपूर (ग्रामीण) पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दवलामेटी (हेटी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची शिक्षकांनी साफसफाई व ...

Officers inspected the school | अधिकाऱ्यांनी केली शाळेची पाहणी

अधिकाऱ्यांनी केली शाळेची पाहणी

वाडी : नागपूर (ग्रामीण) पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दवलामेटी (हेटी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची शिक्षकांनी साफसफाई व आकर्षक रंगरंगाेटी केली. त्यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन पाहणी केली.

शाळा इमारतीच्या रंगरंगाेटीसाठी मुख्याध्यापिका उमा चौधरी, शिक्षिका मनीषा चौधरी व शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या मनीषा चंदिवाले व नलू कपनीचोर यांनी संयुक्तरित्या सहकार्याने केले. त्यांनी इमारतीच्या भिंतींवर आत व बाहेरून चित्ररूपात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रेखाटला आहे. ही चित्रे शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक असल्याने प्रशासनाने दखल घेत शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी राजेशकुमार लोखंडे, केंद्रप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी शरद भांडारकर, प्रेमा दिघोरे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आनंद राखडे, ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे, मुख्याध्यापक भास्कर क्षीरसागर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश कोल्हे, बोहरे, भिसे यांचा समावेश हाेता.

Web Title: Officers inspected the school