शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आता मिळणार का कापसाला भाव?

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

शेतकऱ्यांच्या पिकांना विशेषत: विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील कापसाला प्रति क्ंिवटल ६ हजार रुपये भाव मिळावा तसेच सोयाबीन व धानालासुद्धा योग्य भाव मिळावा, ...

भाजपनेच केली होती मागणी : फडणवीस, खडसे आणि मुनगंटीवार राहायचे आग्रहीआनंद डेकाटे  नागपूरशेतकऱ्यांच्या पिकांना विशेषत: विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील कापसाला प्रति क्ंिवटल ६ हजार रुपये भाव मिळावा तसेच सोयाबीन व धानालासुद्धा योग्य भाव मिळावा, अशी मागणी आताचे सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीनेच उचलून धरली होती. या मागणीसाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सभागृह दणाणून सोडले होते. आता फडणवीस खुद्द मुख्यमंत्री आहेत. मुनगंटीवार हे वित्तमंत्री तर खडसे हे महसूल मंत्री आहेत. तेव्हा शेतकऱ्यांच्या पिकांना आणि विशेषत: कापसाला योग्य भाव मिळेल का, असा प्रश्न हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या दयनीय प्रश्नाबाबत जेव्हा कधी चर्चा होते, तेव्हा कापसाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न वाढले आहे. त्यांना शेती परवडणारी राहिलेली नाही. त्यातूनच आत्महत्या वाढलेल्या आहेत, असेच सांगितले जाते. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यायचाच असेल तर कापसाला प्रति क्विंटल ६ हजार रुपये आणि सोयाबीनला ३ व धानाला २ हजार रुपये हमी भाव दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीनेच विधानसभेत उचलून धरली होती. यासंदर्भात अनेकदा विशेष चर्चा सुद्धा उपस्थित केल्या होत्या. प्रत्येक चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथराव खडसे आणि सुधीर मुनगंटीवार हे शेतकऱ्यांचे विशेषत: कापूस उत्पादकांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडायचे.२०११ साली हिवाळी अधिवेशनादरम्यान एकनाथराव खडसे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कापसाला ६ हजार, सोयाबीनला ३ हजार आणि धानाला २ हजार रुपये भाव मिळावा, या मागणीचा प्रस्ताव मांडला होता. तेव्हा त्यावर बोलतांना ते भावनिक झाले होते. ते म्हणाले होते की ‘ मी स्वत: कापूस व केळी उत्पादक शेतकरी आहे. मी कसणारा शेतकरी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा मी जाणतो. एका बाजूला सर्व वस्तूंच्या किमती वाढत असतंना सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस का धरत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. इतकेच नव्हे तर कृषी मूल्य आयोगाची कापसाची भाव ठरविण्याची पद्धतच मुळाच चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. १२ डिसेंबर २०१३ साली अतिवृष्टीवरील चर्चेत बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी , विदर्भात कापसाला ४ हजार रुपये दर परवडू शकत नाही, असे स्पष्ट केले होते. कृषी मूल्य समितीने शिफारस केलेली किंमत आणि केंद्र शासनाच्या एमएसपी यात मोठी तफावत असल्यामुळे विदर्भातील कापूस, धान आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच ही तफावत दूर करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना बोनस द्यावा. तसेच शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘मगरमच्छ के आँसू’ न वाहता त्यांना तातडीने मदत करावी, आग्रही भूमिका मांडली होती सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा १२ डिसेंबर २०१३ रोजी आयोजित दुष्काळावरील चर्चेवर बोलतांना शासनाला चांगलेच धारेवर धरले होते. शेतकऱ्यांनी धान्य पिकविले नाही तर आपले काय होईल, असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी कडक उन्हात नांगरटी, वखरटी करतो. पावसाळ्यात साप, नाग, विंचूची चिंता न करता चिखल तुडवितो थंडीत आपल्या मुलांना आपल्या छातीशी कवटाळून झोपावे, असे वाटत असतांना रानडुकरांपासून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेताची राखणी करतो परंतु त्या शेतकऱ्याच्या नशिबी शासन केवळ तीन साडेतीन हजार रुपयाची नुकसान भरपाई देतो, याने काय होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. कापूस उत्पादकाची परिस्थिती अजूनही तशीच आहे. कापसाला आजही ६ हजार रुपये भाव मिळालेला नाही. भाजपची सत्ता आहे आणि तिन्ही प्रमुख नेते आज महत्त्वाच्या पदांवर आहेत. त्यामुळे यंदा तरी कापूस उत्पादकांना न्याय मिळेल का, असा प्रश्न कापूस उत्पादकांना पडला आहे.