आता ‘ड्रग्स’च्या नशेत वाहने चालविणाऱ्या चालकांवर हंटर, जागेवरच अंमली पदार्थांची ओळख पटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 22:03 IST2026-04-30T22:02:56+5:302026-04-30T22:03:16+5:30

नशेखोर चालकांविरोधात कारवाई वाढणार, पोलिसांकडे आधुनिक ‘ड्रग टेस्टिंग किट्स’

Now drivers driving under the influence of drugs will be hunted down, drugs will be identified on the spot | आता ‘ड्रग्स’च्या नशेत वाहने चालविणाऱ्या चालकांवर हंटर, जागेवरच अंमली पदार्थांची ओळख पटणार

आता ‘ड्रग्स’च्या नशेत वाहने चालविणाऱ्या चालकांवर हंटर, जागेवरच अंमली पदार्थांची ओळख पटणार


नागपूर : उपराजधानीत दारूसोबतच अंमली पदार्थांचा नशा करून वाहने दामटण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा नशेखोरांविरोधात आता पोलिसांकडून कारवाई वाढविण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक ‘ड्रग टेस्टिंग किट्स’ देण्यात येणार आहेत. त्याच्या माध्यमातून जागेवरच अंमली पदार्थांची ओळख पटू शकणार आहे. महाराष्ट्रदिनापासून याच्या माध्यमातून वाहनचालकांची तपासणी सुरू होणार आहे.

नशेत गाडी चालवणारे चालकांवर नियंत्रणाची आवश्यकता व्यक्त करण्यात येत होती. अशा व्यक्तींना पकडण्यासाठी शहर पोलीस एक विशेष मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेसाठी शहर पोलिसांना ड्रग टेस्टिंग किट्स देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुरुवारी या किट्सचे उद्घाटन केले. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी पोलीस ब्रेथ अॅनालायझरचा वापर करतात. मात्र अनेक तरुण एमडी, गांजा, अफू, ब्राऊन शुगर आणि एलएसडी यांसारख्या विविध अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. त्यांनी नेमकी कसली नशा केली आहे हे जागेवर ओळखता येत नाही आणि वैद्यकीय तपासणीनंतरच त्याची खात्री होते. मात्र, ड्रग टेस्टिंग किटमुळे पोलिसांचे काम सोपे झाले आहे. या किटद्वारे चालकाच्या लाळेचा नमुना घेतला जाईल. तो किटमध्ये ठेवल्यावर चालकाच्या नशेची पातळी ओळखली जाईल. याच्या आधारे, एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल आणि चालकाची वैद्यकीय तपासणी केली जाईल. ही चाचणी मोहीम शुक्रवार, १ मे पासून सुरू होईल.

सध्या शहर पोलिसांना दोन किट्स देण्यात आले आहेत. भविष्यात त्यांची संख्या वाढवली जाईल. ही मोहीम 'ऑपरेशन यू-टर्न'च्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. पोलीस अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मद्यपान करून वाहन चालवणे हे स्वतःसाठी आणि इतरांसाठीही अत्यंत धोकादायक आहे असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्यांनी या मोहिमेत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, महानगरपालिका आयुक्त विपिन इटणकर, उपायुक्त लोहित मतानी, निकेतन कदम, नित्यानंद झा, ऋषिकेश सिंगा रेड्डी आणि दीपक अग्रवाल उपस्थित होते.

सेव्ह लाईफ फाऊंडेशनने त्यांच्या सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून अत्याधुनिक चाचणी यंत्रे पोलीस दलाला दिली आहेत. फाऊंडेशनचे संस्थापक पियुष तिवारीदेखील उपस्थित होते.

Web Title : नशे में वाहन चलाने वालों पर शिकंजा: मौके पर ही होगी ड्रग टेस्टिंग!

Web Summary : महाराष्ट्र दिवस से नागपुर पुलिस ड्रग टेस्टिंग किट का इस्तेमाल करेगी, जिससे लार के नमूनों से तुरंत नशीले पदार्थों के प्रभाव में गाड़ी चलाने वालों की पहचान की जा सकेगी। इससे एनडीपीएस अधिनियम के तहत तत्काल कानूनी कार्रवाई हो सकेगी, जिससे सड़क सुरक्षा बढ़ेगी और नशीली दवाओं के दुरुपयोग पर अंकुश लगेगा।

Web Title : Crackdown on Drugged Drivers: On-the-spot Drug Testing Begins!

Web Summary : Nagpur police will use drug testing kits from Maharashtra Day to identify drivers under the influence of narcotics instantly via saliva samples. This will enable immediate legal action under the NDPS Act, enhancing road safety and curbing drug abuse.