शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

ट्यूशन क्लासमध्ये ना मास्क, ना अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपाच्या एनडीएस पथकाने शहरातील शहरात दोन ठिकाणी धाड टाकून ८०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपाच्या एनडीएस पथकाने शहरातील शहरात दोन ठिकाणी धाड टाकून ८०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या, तसेच १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुद्ध नगर व सतरंजीपुरा येथील शिकवणी वर्गावरही कारवाई करीत २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

शिकवणी वर्गही आता एनडीएस पथकाच्या रडारवर आले आहेत. शनिवारी दोन ट्यूशन क्लासेसवर कोविड नियमांच्या उल्लंघनासंदर्भात कारवाई करण्यात आली. आसीनगर झोनच्या पथकाने बुद्ध नगर येथील एका ट्यूशन क्लासवर कारवाई केली. येथे कोविड नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात होते. बुद्ध नगरातील शिकवणी वर्गावर १५ हजार, तर सतरंजीपुऱ्यातील शिकवणी वर्गाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

८०० किलो प्लास्टिक जप्त,

३५ हजारांचा दंड

पहिली कारवाई इतवारी येथील पारस प्लास्टिकवर करण्यात आली. इतवारीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या आल्या असल्याची माहिती एनडीएस पथकाला मिळाली होती. त्या आधारावर मनपाच्या गांधीनगर व सतरंजीपुरा झोनच्या पथकाने कारवाई केली. पारस प्लास्टीकचे जनाव कदीर यांच्यावर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. त्यांना १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

तसेच झांशी राणी चौकातील बॉम्बे सेल्स यांच्याकडून ५० किलो नॉन ओवन व प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. पहिलीच कारवाई असल्याने ५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.