शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१९३६ साली नासुप्रची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

बाॅक्स १९३६ साली नासुप्रची स्थापना नागपूर शहर व लगतच्या नवीन भागाचा विकास करण्यासाठी सन १९३६ साली नागपूर सुधार प्रन्यास ...

बाॅक्स

१९३६ साली नासुप्रची स्थापना

नागपूर शहर व लगतच्या नवीन भागाचा विकास करण्यासाठी सन १९३६ साली नागपूर सुधार प्रन्यास या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती. तथापि, २००२ साली नागपूर सुधार प्रन्यासकडून राबविण्यात येत असलेल्या सात योजना वगळून नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनयम १९६६ च्या तरतुदीनुसार नागपूर महानगर विकास प्राधिकरण म्हणून स्थापना झालेली आहे.

एकाच प्रयोजनासाठी नागपूर शहरात दोन प्राधिकरणे अस्तित्वात असल्यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याने एकच प्राधिकरण असावे, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र नासुप्र बरखास्तीच्या घोषणेनंतर शहरातील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्यात आलेली शिथिलता व त्या अनुषंगाने विकास कामे रखडल्याने नासुप्र बरखास्त करू नये, यासाठी नागरिकांकडून लोकप्रतिनिधींकडे मागणी वाढली होती.

बाॅक्स..

भाजपचा विरोध, शासनाच्या निर्णयाचा निषेध

नासुप्र बरखास्ती रद्द करण्याबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाला भाजपने विरोध दर्शविला आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी शासनाच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला आहे. विद्यमान महाराष्ट्र सरकारने शहरातील जनतेला अंधारात लोटण्याचा निर्णय घेतला आहे. नासुप्रच्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे शहरातील अनधिकृत ले-आऊटची संख्या वाढली होती. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने नासुप्रचे महानगरपालिकेमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती. ज्या राजकीय पक्षांनी नासुप्रच्या चुकीच्या कार्यप्रणाली विरोधात अनेक आंदोलन केली, त्याच राजकीय पक्षांच्या नेतृत्वात पुन्हा नासुप्रचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील जनतेला पुन्हा एकदा अंधारात लोटण्याचा हा प्रकार आहे, असे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.