नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवून नेले फरफटत ; मुरूम माफियांनी केला महसूल पथकावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 20:24 IST2026-05-07T15:02:08+5:302026-05-07T20:24:53+5:30

Nagpur : कायद्याला थेट आव्हान देत मुरूम माफियांनी महसूल पथकावर हल्ला चढविल्याची संतापजनक घटना कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात घडली.

Naib Tehsildar was dragged away by hanging from a JCB; Murum mafia attacked the revenue team | नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवून नेले फरफटत ; मुरूम माफियांनी केला महसूल पथकावर हल्ला

Naib Tehsildar was dragged away by hanging him from a JCB

लोकमत न्यूज नेटवर्क
कुही :
कायद्याला थेट आव्हान देत मुरूम माफियांनी महसूल पथकावर हल्ला चढविल्याची संतापजनक घटना कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात घडली. ५ मे रोजी मध्यरात्री ११.३० वाजेच्या सुमारास झालेल्या या थरारक प्रकारात नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना चालत्या जेसीबीला लटकवन तब्बल 3 ते ४ किलोमीटरपर्यत फरपटत नेण्यात आले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

बोरी नाईक परिसरात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाची माहिती मिळताच नायब तहसीलदार निकाळजे यांनी तातडीने धाड टाकली. त्यांच्या सोबत ग्राम महसूल अधिकारी मोहन पवार, आनंद मस्के आणि महसूल सेवक नीलेश तिरपुडे उपस्थित होते. कारवार्ड सरू होताच माफियांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान एका ट्रॅक्टरचालकाने थेट निकाळजे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत ते बाजूला झाल्याने थोडक्यात जीव वाचला; मात्र चालक पळून गेला. त्यानंतर महसूल पथकाने जेसीबी (क्र. एमएच ४० सीक्यू २३८८) अडविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जेसीबीचालक मयूर थोटे (रा. दहेगाव, ता. मौदा, हल्ली मुक्काम राजोला, ता. कुही) याने थेट पोलिस व महसूल यंत्रणेला झुगारून वाहन वेगाने पलवले. त्याला थांबविण्यासाठी निकाळजे जेसीबीवर चढले; पण थोटेने निर्लज्जपणे त्यांना लटकलेल्या अवस्थेतच गाडी पळवली. निकाळजे यांना खाली पाडून गंभीर जखमी करण्याच्या उद्देशाने जेसीबी काटेरी झुडपांतून चालवण्यात आला. तब्बल ३ ते ४ किलोमीटरपर्यंत हा अंगावर काटा आणणारा थरार सुरू राहिला. या प्रकारात निकाळजे यांचा शर्ट फाटला असून, त्यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच वेलतूर पोलिस स्टेशनचे एपीआय राऊत पथकासह घटनास्थळी दाखल झाले. समोरून पोलिसांची गाडी येताना दिसताच चालकाने जेसीबी थांबवली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या कारवाईदरम्यान महसूल व पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रकरणी कुही पोलिसांनी जेसीबीचालक मयूर थोटे याला बुधवारी अटक केली.

अधिकाऱ्यांवर हल्ले ही गंभीर बाब

अवैध उत्खननाविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच जीवघेणे हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. माफियांचा बेतालपणा शिगेला पोहोचला आहे. संबंधितांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महसूल विभाग, कुही यांनी दिला आहे.

Web Title : अवैध रेत खनन: नायब तहसीलदार को जेसीबी से घसीटा, कुही में हमला

Web Summary : कुही, महाराष्ट्र में अवैध रेत खनन पर छापे के दौरान एक नायब तहसीलदार पर हमला किया गया और जेसीबी से घसीटा गया। अधिकारी ट्रैक्टर से कुचले जाने से बाल-बाल बचे। पुलिस ने जेसीबी चालक को गिरफ्तार किया।

Web Title : Illegal sand mining: Revenue officer dragged by JCB, attacked in Kuhi.

Web Summary : In Kuhi, Maharashtra, a revenue officer was attacked and dragged by a JCB during a raid on illegal sand mining. The officer narrowly escaped being run over by a tractor. Police arrested the JCB driver.