शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदाराची गळफास लावून आत्महत्या; बहिणीला लटकलेल्या अवस्थेत दिसला भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:42 IST

Nagpur : वारंवार दार ठोठावून तसेच फोन करून भाऊ प्रतिसाद देत नसल्याने भेटायला आलेल्या बहिणीने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, बहिणीला तिचा भाऊ छताला लटकलेल्या अवस्थेत दिसला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : वारंवार दार ठोठावून तसेच फोन करून भाऊ प्रतिसाद देत नसल्याने भेटायला आलेल्या बहिणीने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, बहिणीला तिचा भाऊ छताला लटकलेल्या अवस्थेत दिसला. भाऊ मौदा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत होता तसेच त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.  ही घटना एमआयडीसी (हिंगणा) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी येथे रविवारी (दि. ३) रात्री ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

वैभव रामेश्वर राठोड (४२, रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, वानाडोंगरी, ता. हिंगणा) असे मृताचे नाव आहे. ते मागील काही महिन्यांपासून मौदा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत होते. ते पत्नी, मुलगा व मुलीसोबत वानाडोंगरी येथील ग्रीन फिल्ड सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहायचे. त्यांच्या मेव्हण्याकडे विवाह सोहळा असल्याने पत्नी, मुलगा व मुली लग्नासाठी गेल्याने तसेच रविवारी सुटी असल्याने ते घरी एकटेच होते.

दरम्यान, कळमनुरी (जिल्हा हिंगोली) येथे राहणारी त्यांची बहीण रविवारी रात्री त्यांना भेटण्यासाठी आली होती. फ्लॅटचे दार आतून बंद असल्याने तिने दार ठोठावले प्रतिसाद न मिळाल्याने तिने त्यांच्या मोबाइल फोनवर वारंवार कॉल केले. ते प्रतिसाद देत नसल्याने तिने शेवटी शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळविले.

पोलिसांनी दार उघडून बघितले असता, ते बेडरूममध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होताच पोलिसांनी पाहणी व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

English
हिंदी सारांश
Web Title : Naib Tehsildar commits suicide by hanging; sister finds body.

Web Summary : A Naib Tehsildar in Mouda committed suicide by hanging himself at his Wanadongri residence. His sister, visiting him, discovered the body after he didn't respond to calls and knocks. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर