शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

६०३ कोटींच्या आराखड्याने नागपूरचा वीजपुरवठा होणार ‘हायटेक’

By आनंद डेकाटे | Updated: May 14, 2026 20:16 IST

Nagpur : उपराजधानी नागपूरच्या वाढत्या वीज गरजा लक्षात घेता महावितरणने जिल्ह्याच्या वीज वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ६०२.९८ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा तयार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
उपराजधानी नागपूरच्या वाढत्या वीज गरजा लक्षात घेता महावितरणने जिल्ह्याच्या वीज वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ६०२.९८ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा तयार केला आहे. आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम, अखंडित आणि तंत्रज्ञानाधिष्ठित होणार आहे. भविष्यात ट्रिपिंग आणि अघोषित वीज कपातीपासून नागपूरकरांची मोठ्या प्रमाणात सुटका होणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे.

राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या विशेष आढावा बैठकीत या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी जिल्ह्यातील विद्यमान वीज यंत्रणा आणि आगामी विकासकामांचा तपशील सादर केला. या बैठकीला अधीक्षक अभियंते अमित परांजपे, संजय वाकडे उपस्थित होते.

२१ नवी उपकेंद्रे, ३०० किमी भूमिगत वाहिन्या

नागपूर शहराची विजेची मागणी सध्या ८७५ मेगावॅटच्या पुढे गेली असून उन्हाळ्यातील वाढत्या ताणाचा सामना करण्यासाठी महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एडीबी’ योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात २१ नवीन ३३/११ केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये नागपूर शहर मंडळातील ९ तर ग्रामीण भागातील १२ ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय विद्यमान ७ उपकेंद्रांची क्षमता वाढवून तेथील यंत्रणा अधिक गतिमान केली जाणार आहे. ग्राहकांना सातत्यपूर्ण दाबाने वीज मिळावी यासाठी ४०५ नवीन वितरण रोहीत्रे बसवली जाणार असून १५६ किलोमीटर नवीन उपरी वाहिन्या आणि सुमारे ३०० किलोमीटर भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे.

दाभा, हिंगणा, सुभाननगर, न्यू कलमना, तुळशीबाग आणि जाफरनगरला लाभ

दाभा, हिंगणा, सुभाननगर, न्यू कलमना, तुळशीबाग आणि जाफरनगर या वेगाने विकसित होणाऱ्या भागांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. बुटीबोरी औद्योगिक वसाहत, गांधीबाग, महाल आणि सिव्हिल लाईन्स परिसरातही नवीन उपकेंद्रांमुळे विजेचा ताण कमी होऊन पुरवठा अधिक स्थिर होणार आहे. ग्रामीण भागातील काटोल, उमरेड, मौदा आणि कामठी तालुक्यांनाही या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur's power supply to become high-tech with ₹603 crore plan.

Web Summary : Mahavitaran's ₹603 crore plan will modernize Nagpur's power distribution with ADB support. 21 new substations, underground cables will improve supply, reduce outages in city and rural areas. Areas like Dabha, Hingna, Butibori benefit.
टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर