शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

CBSE शिक्षकांना जनगणनेस बोलावणाऱ्या आदेशांना स्थगिती; नागपूर खंडपीठाने बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 21:55 IST

केंद्र सरकार, जनगणना संचालकांना नोटीसही बजावली

नागपूर : सीबीएसई व विनाअनुदानित धार्मिक अल्पसंख्यांक शाळांमधील सुमारे १५० शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी बोलावणाऱ्या आदेशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता अंतरिम स्थगिती दिली. तसेच, केंद्रीय गृह विभागाचे सचिव, जनगणना संचालक, महानगरपालिकेचे प्रधान जनगणना अधिकारी व प्रभारी जनगणना अधिकारी यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.

वादग्रस्त आदेशांविरोधात सीबीएसई स्कूल्स स्टाफ वेलफेयर असोसिएशन, सिख एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित श्री गुरू हरकिशन पब्लिक स्कूल आणि शिक्षकांनी उच्च न्यायालयामध्ये तीन याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी दोन याचिकांवर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे आणि एक याचिकेवर न्यायमूर्तिद्वय उर्मिला जोशी-फलके व निवेदिता मेहता यांच्यापुढे सुनावणी झाली.

दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. पुरुषोत्तम पाटील यांनी जनगणना कायदा व नियमातील तरतुदी आणि 'गोकुल मुंढे व इतर' प्रकरणामधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष वेधून वादग्रस्त आदेश अवैध, मनमानी व अधिकारांचा दुरुपयोग करणारा आहे, असा दावा केला. जनगणना दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या शाळांच्या कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामात गुंतवता येणार नाही. हे कर्मचारी शैक्षणिक कर्तव्यावर गैरहजर राहिल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्यावर वाईट परिणाम पडेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Bench stays summons to CBSE teachers for census duty.

Web Summary : Nagpur High Court halted orders summoning CBSE teachers for census. Notices issued to officials, citing legal concerns and potential impact on students' education. Court seeks clarification.
टॅग्स :Courtन्यायालयMumbai High Court Nagpur Benchमुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठTeacherशिक्षक