शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

मोहफुले म्हणजे फक्त दारूच नव्हे.. 'हे' पण आहेत फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 07:30 IST

Nagpur News आता मोहफुलांवरील बंदी उठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आदिवासींना सीझनमध्ये आर्थिक फायदा मिळेल. सोबतच पर्यावरणपूरक प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळेल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देबंदी उठल्याने प्रक्रिया उद्योगाला मिळेल चालनारोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास महत्त्वपूर्ण

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोहफूल म्हटले की त्यापासून तयार होणारी गावठी दारू हे समीकरण जणू गृहितच धरले गेले आहे. या गृहितकामुळेच त्याच्या असंख्य पौष्टिक फायद्याकडे दुर्लक्ष करून गेल्या कित्येक वर्षांपासून मोहफुलांवर बंदी घातली गेली. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या आदिवासींना आर्थिक लाभ देणारे हे साधन हिरावले. आता मोहफुलांवरील बंदी उठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आदिवासींना सीझनमध्ये आर्थिक फायदा मिळेल. सोबतच पर्यावरणपूरक प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळेल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.मोहफुलांवरील बंदी उठविण्यासाठी नागपूरचे डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या नेतृत्वात २०-२५ वर्षांपासून लढा चालविला होता. त्यांच्या निधनानंतर का होईना या लढ्याला यश आल्याची भावना गडचिरोलीत कार्य करणारे डॉ. सतीश गोगुलवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, दारू केवळ मोहापासून बनते असे नाही. द्राक्षे, ऊस, संत्री याशिवाय तांदूळ, गव्हापासूनही दारू तयार केली जाते. मात्र यावर बंदी घातली गेली नाही. पण मोहफुलांवर बंदी घालणे अनाकलनीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रिशनच्या रिपोर्टनुसार मोहफुलांमध्ये द्राक्षांपेक्षा अधिक न्यूट्रिशन असते, शिवाय व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियमसाठीही मोहाचे महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे द्राक्षे किंवा संत्र्यांवर कीटनाशकांचा मारा असतो. पण मोह म्हणजे कोणतीही फवारणी न करता तयार झालेले शुद्ध नैसर्गिक खाद्य होय. मात्र केवळ दारूशी संबंध जोडून आदिवासी समाजाच्या शुद्ध खाद्याला दूर ठेवण्यात आल्याची खंत डॉ. गोगुलवार यांनी व्यक्त केली. कोरोना काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मोहफुलांचे महत्त्व समजले आहे.एक कुटुंब गोळा करते एक-दीड टन मोहडॉ़ गोगुलवार यांनी सांगितले, गडचिराली भागात सीझनच्या वेळी बहुतेक कुटुंब मोहफुले गोळा करतात. एक कुटुंब या १०-१२ दिवसाच्या काळात एक ते दीड टन मोहफुल गोळा करतात. हे मोहफुल ४०-४५ रुपये दराने विकले जातात. म्हणजे सीझनमध्ये त्यांना २०-२५ हजाराचा धनलाभ होतो. मात्र खरेदी करणारे भीती दाखवून कमी दरात खरेदी करतात. बंदी उठविल्याने त्यांना कायदेशीरपणे ते विकता येईल. डॉ. गोगुलवार यांच्या पुढाकारातून कोरची भागात गावकऱ्यांना मोहफुल गोळा करण्यासाठी प्रेरित केले. वनहक्क प्राप्त ग्रामसभा व वनधन विक्री केंद्राच्या माध्यमातून ते खरेदी करण्यात येत असून नागरिकांना आर्थिक लाभ मिळत आहे. आदिवासी समाजाद्वारे मोहफुल झाडाला माऊली म्हणून ओळखले जाते. म्हणून त्यांनी या वृक्षांना जतन करून ठेवले आहे.तरुण उद्योजकांनी पुढे यावेआदिवासींच्या अन्नात कायम मोहफुलांचा समावेश राहिला आहे. मोहापासून लाडू, मिठाई, ज्यूस आदी गोष्टी तयार केल्या जातात. प्रक्रिया करून इतरही अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करता येतील. मोहफुलांसह इतर वनसंपदेसाठी प्रक्रिया उद्योग स्थापन करून त्याचा प्रसार करता येईल. त्याची मार्केटिंग करून निर्यात करण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. त्यामुळे तरुण उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. गोगुलवार यांनी केले.

 

टॅग्स :forestजंगल