शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कुर्वेंचे मिशन नागपूर सुपरफास्ट

By admin | Updated: May 21, 2015 02:25 IST

नागपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा पहिला दिवस आढावा बैठकांमध्ये गेला.

नागपूर : नागपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा पहिला दिवस आढावा बैठकांमध्ये गेला. पहिल्या दिवशी त्यांनी कामकाजाची रूपरेषा समजून घेतली आणि पुढल्या काही दिवसांत यात आमुलाग्र बदल घडवून आणण्याचा विश्वास व्यक्त केला.सकाळी ११.०५ मिनिटानी कुर्वे यांनी मावळते जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर दुपारी घरी जाऊन जेवण करण्याच्या वेळेचा अपवाद सोडला तर संपूर्ण दिवस त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज समजून घेण्यात घालविला. कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाच्या प्रमुखांनी भेट घेतली.या भेटीत आतापर्यंत विभागात काय काम चालले याची माहिती विभागप्रमुखांनी त्यांना दिली. यात अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) प्रकाश पाटील, नियोजन अधिकारी के.व्ही. फिरके, महसूल, पुरवठा विभाग, निवडणूक विभाग, भूसंपादन, कृषी आणि अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता.दुपारी त्यांनी मेट्रो रेल्वेच्या भूसंपादनाचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराची माहिती घेतली. मिहानच्या प्रगतीबाबतही त्यांनी आढावा घेतला व दोन दिवसात यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी केंद्राच्या जलस्वराज्य योजनेचीही त्यांनी बैठक घेतली.तत्पूर्वी त्यांना मिहानसंदर्भात बाबा डवरे भेटले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संघटनेने भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच स्वतंत्र भेट घेण्याचे आश्वासन कुर्वे यांनी कर्मचारी संघटनेला दिले. त्यानंतर मावळते जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या निरोप समारंभालाही काही काळ ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधून पुढील कामकाजाची दिशा त्यांच्यापुढे मांडली. (प्रतिनिधी)पारदर्शक प्रशासनावर भरआज पहिला दिवस असल्याने आपण कामकाज समजून घेऊ. पुढच्या काळात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनावर भर देऊ, कृष्णा यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या चांगल्या योजना सुरू केल्या आहेत त्या सुरू ठेवू व नवीन काही योजना हाती घेऊ. विविध विभागप्रमुखांशी चर्चा करून पुढील कामकाजाची दिशा ठरवू.सचिन कुर्वे, नवे जिल्हाधिकारी नागपूरधाडसी निर्णय घेतलेजिल्हाधिकारी म्हणून काम करताना फार अल्प कालावधी मिळाला. पण यात मी अनेक धाडसी निर्णय घेतले. हे सर्व निर्णय दूरदृष्टी ठेवून घेतले. त्यांची अंमलबजावणी नवीन जिल्हाधिकाऱ्यांना करायची आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्यातील शक्तिमान कार्यालय असावे असा माझा प्रयत्न होता व त्यादृष्टीने कामकाजालाही सुुरुवात केली होती. जिल्ह्यात नवीन अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वारांगनांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होता.अभिषेक कृष्णा, मावळते जिल्हाधिकारी, नागपूर