शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वे पकडणार गती

By admin | Updated: March 14, 2015 02:37 IST

नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड ( एनएमआरसीएल ) च्या दिल्ली येथे शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड ( एनएमआरसीएल ) च्या दिल्ली येथे शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे. बैठकीत एनएमआरसीएल संदर्भातील कंपनी कायद्यांतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कंपनीतर्फे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी कंपनीचे प्रबंध संचालक (एमडी) बृजेश दीक्षित यांना नागपूर विमानतळ ते खापरीपर्यंतचे काम प्राधान्याने सुरू करण्याचे सर्वांधिकार देण्यात आले आहेत. बैठकीला एनएमआरसीएलच्या १० पैकी ९ सदस्य उपस्थित होते. यात बृजेश दीक्षित, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने आदींचा समावेश होता. परंतु १८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने राज्याचे प्रधान सचिव (वित्त) सुधीर कुमार श्रीवास्तव यांना उपस्थित राहता आले नाही. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती बृजेश दीक्षित यांनी लोकमतला दिली. फ्रान्सचे पथक येणारफ्रान्सची वित्तीय संस्था (एएफसी) चे पथक २६ ते २८ मार्च दरम्यान नागपूर दौऱ्यावर येत आहे. या संस्थेने प्रकल्पासाठी १५०० कोटींचे कर्ज देण्याला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. यात वाढ व्हावी, यासाठी मेट्रो रेल्वे कार्पोरेशन प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले.