शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मेयोत प्रादेशिक विषाणू प्रयोगशाळा!

By admin | Updated: November 4, 2014 01:01 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रादेशिक विषाणू प्रयोगशाळेला मान्यता दिली. मात्र, या प्रयोगशाळेच्या

निधी मंजूर : अखेर प्रयत्नाला आले यशनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रादेशिक विषाणू प्रयोगशाळेला मान्यता दिली. मात्र, या प्रयोगशाळेच्या सुरुवातीच्या पाच वर्षांचा खर्च आयएमसीआर आणि नंतरचा खर्च राज्य सरकारने उचलावा, अशी अट होती. वर्षाकाठी साधारण एक ते दीड कोटींचा हा खर्च असणार होता. या संदर्भातील कराराचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविण्यात आला. परंतु प्रस्तावावर राज्य शासनाच्या वित्त विभागाची स्वाक्षरीच होत नव्हती. अखेर अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांच्या विशेष प्रयत्नांना यश मिळाले. आता लवकरच विदर्भातील ही पहिली प्रयोगशाळा मेयोमध्ये सुरू होत आहे. मेडिकल, मेयो किंवा खासगी इस्पितळांमध्ये भरती असलेल्या विषाणुजन्य संशयितांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी जायचे. याचा अहवाल येईपर्यंत साधारण पाच दिवस लागायचे. आजाराचे निदान होण्यास उशीर व्हायचा. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक राहायची. यात शासनाचा मोठा निधीही खर्च व्हायचा. यावर उपाय म्हणून ‘इन्फ्लूएन्झा प्रकल्पा’अंतर्गत ‘मेयो’ रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत स्वाईन फ्लूचे नमुने तपासण्याची तात्पुरती सोय करून देण्यात आली. परंतु येथे मर्यादित नमुनेच तपासले जात होते. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेवरील भार कमी झालेला नव्हता. दरम्यानच्या काळात केंद्राने राज्यात चार प्रादेशिक विषाणू प्रयोगशाळा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील वर्षी आयसीएमआरच्या दोन सदस्यांच्या चमूने मेयोच्या प्रयोगशाळेची पाहणी केली. येथील तंत्रज्ञ आणि डॉक्टरांशीही त्यांनी संवाद साधला. प्रयोगशाळा उभारण्यात येणाऱ्या नवीन जागेची पाहणीही केली. मेयोतील मनुष्यबळ आणि पायाभूत सोयी लक्षात घेऊन आयसीएमआरने प्रादेशिक विषाणू प्रयोगशाळेला मान्यता दिली. प्रयोगशाळेच्या सुरुवातीच्या पाच वर्षांचा खर्च आयएमसीआर आणि नंतरचा खर्च राज्य सरकारने उचलायचा होता. या संदर्भातील कराराचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. परंतु नऊ महिने यावर निर्णयच झाला नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी यासंदर्भात संबंधित विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला. रुग्णालयासाठी या प्रयोगशाळेचे महत्त्व पटवून दिले. अखेर त्याला यश मिळाले. मागील आठवड्यात या प्रस्तावावर स्वाक्षरी होऊन निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)